लातूर: 11 वर्षीय मुलीचा थंडी- तापाने उपचारादरम्यान मृत्यू, कुटुंबीयांनी डॉक्टरांना धरलं धारेवर

मुंबई तक

24 Oct 2026 (अपडेटेड: 24 Oct 2026, 01:24 PM)

Latur crime news : लातूर येथे एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे निष्पाप मुलीचा जीव गेल्याचे वृत्त आहे. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केलेत.

Latur crime news

Latur crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

थंडी आणि ताप आल्याने श्रुती सहा दिवसांपासून रुग्णालयात दाखल

point

श्रुतीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी स्पर्श रुग्णालयातील डॉक्टरांना धरले जबाबदार

Latur Crime News : अनिकेत जाधव - लातूर येथे एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे निष्पाप मुलीचा जीव गेल्याचे वृत्त आहे. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले, तसेच मुलीच्या मृत्यूसाठी डॉक्टरांना जबाबदार धरले होते. मृत मुलीची श्रुती प्रवीण घनगाव (वय 11) अशी ओळख समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : काही राशींना आनंद, तर काही राशींवर चिंतेचे सावट

थंडी आणि ताप आल्याने श्रुती सहा दिवसांपासून रुग्णालयात दाखल

या प्रकरणात मृत मुलीची आई वर्षा प्रवीण घनघावने स्पर्श रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केलेत. श्रुतीला थंडी आणि ताप आल्याने तिला सहा दिवसांपासून रुग्णालयात दाखल करून ठेवले होते. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता स्पर्श हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी श्रुतीची प्रकृती चांगली असल्याचे सांगून तिला डिस्चार्ज दिला. डिस्चार्जनंतर 22 ऑक्टोबर रोजी तिला फॉलोअपसाठी डॉक्टरांनी बोलावले. सर्व व्यवस्थित आहे, फक्त एक सलाईन इंजेक्शन लावावी लागेल असे सांगून पुन्हा तिला अॅडमिट केले. 

श्रुतीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी स्पर्श रुग्णालयातील डॉक्टरांना धरले जबाबदार

नंतर डॉक्टरांनी सलाईन आणि इंजेक्शन देणे सुरू केले आणि तिच्यावर पुन्हा उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र, काही वेळांतच मुलीच्या तोंडातून आणि नाकातून रक्त वाहू लागले. तेव्हा डॉक्टरांनी श्रुतीला तिच्या आई वडिलांना भेटू दिले नाही, थेट दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता श्रुतीच्या निधनाबाबत सांगितले. श्रुतीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी स्पर्श रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना जबाबदार धरले. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात वातावरणात बदल, 'या' जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट

डॉ. बजाज, नागमोडे आणि शेख या तिन्ही डॉक्टरांवर असा आरोप करण्यात आला आहे की, त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे आमच्या मुलीने आपला जीव गमावला आहे, त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांचे स्पर्श रुग्णालय बंद केले पाहिजे.