Maharashtra Weather : राज्यात वातावरणात बदल, 'या' जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात सध्या उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, अशातच जाणून घ्या 24 ऑक्टोबर रोजीच्या हवामानाच एकूण अंदाज पुढे..

ADVERTISEMENT

Maharashtra Weather (AI Photo)
Maharashtra Weather (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यात सध्या उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता

point

24 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

Maharashtra Weather : राज्यात सध्या उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविली आहे, अशातच जाणून घेऊयात 24 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला. 

हे ही वाचा : मॉर्निंग वॉक करताना तरुणाला मर्सिडीजने दिली धडक, गाडीवर 'महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य'चे स्टिकर

कोकण 

कोकणात पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट वर्तविलेला आहे, तर रत्नागिरीत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता असते. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा परिसरात मेघगर्सनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सातारा आणि सांगलीत मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविली आहे. 

हे ही वाचा : नवी मुंबई: प्रेयसीसाठी बदललं नाव, दुर्लक्ष केल्यानं प्रियकरानं चाकूने वार करत तरुणीला संपवलं

विदर्भ 

विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.