मुलांच्या भांडणातून वाद; महिलेने दीराच्या गुप्तांगाला घेतला चावा, 55 टाके

मुंबई तक

• 04:26 PM • 25 Oct 2026

Kanpur Crime News : कानपूरमध्ये मुलांच्या भांडणातून कुटुंबात वाद झाला. महिलेने दीराच्या गुप्तांगाला चावा घेतल्याचा आरोप असून, जखमी तरुणाला 55 टाके घालण्यात आले.

Kanpur Crime News

Kanpur Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कानपूरमध्ये मुलांच्या भांडणातून वाद

point

महिलेने दीराच्या गुप्तांगाला घेतला चावा, 55 टाके

Kanpur Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मुलांच्या भांडणातून कुटुंबातील मोठ्यांमध्ये वाद झाला. या वादात महिलेने आपल्या दीराच्या गुप्तांगाला दातांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याला 55 टाके घालण्यात आले. या प्रकरणी जखमी तरुणाच्या पत्नीने तिच्या जाऊविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला, मंदिर परिसरात दोघांचा खून; नेमकं काय घडलं?

महिलेने दीराच्या गुप्तांगाला दातांनी चावा घेतल्याचा आरोप

ही घटना कानपूरमधील सजेटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुराऊपूर गावात घडली. संबंधित तरुणाच्या भावाच्या मुलाचा आणि कुटुंबातील इतर मुलांचा वाद झाला होता. या वादातून तरुणाने आपल्या भावाच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तरुणाच्या पत्नीनेही त्या मुलाला फटकारले होते. मुलाने घरी जाऊन ही माहिती आईला सांगितली. त्यामुळे ती संतप्त झाली आणि वाद घालण्यासाठी घटनास्थळी पोहोचली. यानंतर तिचा तिच्या दीर आणि जावेबरोबर वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच वेळी महिलेने दीराच्या गुप्तांगाला दातांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला.

हेही वाचा : दुकानदाराने लिफाफा उघडला अन् बाहेर आला मनगटापासून तुटलेला हात! क्रूरतेची सीमा ओलांडणारी घटना

जखमी तरुणाच्या पत्नीची जाऊ बाईविरोधात पोलिसांत लेखी तक्रार 

घटनेनंतर जखमी तरुणाच्या वडिलांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला त्याला घाटमपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती पाहून त्याला पुढील उपचारांसाठी कानपूरमधील हॅलेट रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. या उपचारादरम्यान तरुणाला 55 टाके घालण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. या घटनेनंतर जखमी तरुणाच्या पत्नीने आपल्या जाऊ बाईविरोधात पोलिसांत लेखी तक्रार दिली.

या प्रकरणाबाबत घाटमपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त कृष्णकांत यांनी सांगितले की, तरुणाच्या भावाच्या पत्नीने त्याच्यावर हल्ला करून त्याच्या गुप्तांगाला चावा घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली. जखमी तरुणाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी तपास सुरू आहे. संबंधित महिलेचा पती गुजरातमध्ये नोकरी करतो. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तोही परत येत असल्याचे सांगण्यात आले. मुलांच्या भांडणातून सुरू झालेला वाद कुटुंबातील मोठ्यांपर्यंत पोहोचला आणि त्यातून ही गंभीर घटना घडल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.