Mumbai Crime News : मुंबईच्या घाटकोपर येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी रात्री हैवानी बापाने आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवरून खाली फेकून देण्यात आले होते. तब्बल 20 फूट उंचीवरून बाळाला खाली फेकून दिल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेदरम्यान आरडाओरडा आणि गोंधळ सुरु असताना स्थानिक लोकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी वडिलांना घटनास्थळीच पकडण्यात आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : आज सोमवार, 'या' राशींवर राहणार महादेवाची कृपादृष्टी
क्रूप बापाने नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून दिलं फेकून
घाटकोपर पोलीस ठाण्यातून मिळाल्या माहितीनुसार, ही घटना 25 ऑक्टोबर रोजी रात्री 8.15 वाजण्याच्यादरम्यान घडली, पीडिता आरती जाफर शेख आपल्या नऊई महिन्याचा मुलगा आरवसोबत घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर बनवलेल्या स्कायवॉकवर उभा होता. त्यानंतर जाफर शेख हा घटनास्थळी पोहोचला होता. काही कौटुंबिक वादातून जाफरने नऊ महिन्याचा मुलगा आरवला हिसकावून घेतले आणि स्कायवॉकवरून फेकून दिले.
मुलगा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात
खाली असलेल्या लोकांनी मुलाला स्कायवॉकवरून फेकून देताना पाहिलं होतं. मुलगा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आई किंचाळल्यानंतर आसपासचे काही लोक घटनास्थळी धावून आले होते. पोलिसांच्या मदतीने मुलाला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. माहितीनुसार, मुलाच्या डोक्याला आणि शरीरातील आतील भागांना बेदम मार लागला आहे. अशातच लहान मुलीची प्रकृती ही नाजूक असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील हवामानाचा लपंडाव, निम्म्याहून अधिक जिल्ह्यांत कोरडे हवामान
या घटनेनंतर घाटकोपर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, नंतर त्यांनी आरोपी जाफर शेखच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरती शेख हिच्या तक्रारीवर आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता 109(1), 351(3), 352 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, अशातच आरोपीला अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT












