Nagpur Crime : नागपूरमध्ये डेटिंग अॅपद्वारे झालेल्या मैत्रीनंतर ब्लकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आणि त्याच्याकडून तब्बल 3 कोटी रुपये उकळल्याचा कट रचण्यात आला होता. यासाठी एका 19 वर्षीय महिलेला 5 लाख रुपयांचे आमिष दाखवले. महिलेनं सुरुवातीला राजस्थानमधील एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली, परंतु तपासादरम्यान तिला जबाब बदलला. पोलिसांच्या माहितीनुसार, तिने सांगितलं की, आदित्य गुप्ताने तिला तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. आता पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी आदित्य गुप्ताला उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'माझ्यापेक्षा जास्त कमावतेस, थार गाडी दे..', हुंड्यासाठी बायकोला अमानुष मारहाण
19 वर्षीय महिलेची आदित्य सुरेशचंद्र गुप्ता नावाच्या व्यक्तीशी ओळख
नागपूर पोलिसांच्या माहितीनुसार, 19 वर्षीय महिला तक्रारदार ही मोमिनपुरा येथील एका परिसरात राहते. ती मनोरंजन आणि शौक्षणिक व्हिडिओ आणि रील्स तयार करते. ती काही काळापासून एका डेटिंग अॅप वापरत होती. याच अॅपद्वारे तिची आदित्य सुरेशचंद्र गुप्ता नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. काही दिवसांपूर्वी राजस्थान येथील रहिवासी असलेल्या इरफान आलीविरुद्ध एका तरुणीने तक्रार दाखल केली. तिने आरोप केला की, तिची इरफानशी एका अॅपवरून ओळख झाली होती. याच अॅपद्वारे तिची आदित्य सुरेशचंद्र गुप्ता याच्याशी झाली.
नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले
काही दिवसांपूर्वी, राजस्थानचा रहिवासी असलेल्या इरफान अलीविरुद्ध एका तरुणाने तक्रार दाखल केली. तिने आरोप केला की, तिची इरफानशी एका अॅपवरून ओळख झाली. इरफानने आपले राजकीय संबंध असल्याचा दावा केला होता. त्या तरुणीच्या म्हणण्यांनुसार, त्याने तिला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले आणि नंतर ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या तक्रारीच्या आधारे, इरफानसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या मोबाईल फोनचा तपशील मागवला आणि तिचा जबाब नोंदवण्यासाठी तिला पोलीस ठाण्यात बोलावले. चौकशीदरम्यान अदित्य गुप्ता तिच्यासोबत होता. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, चौकशीदरम्यान आदित्यच्या आग्रहावरून तिने ही तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : बीड: 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कुटुंबीयांना हत्येचा संशय
3 कोटी रुपये उकळण्याचा कट
पोलिसांच्या तपासानुसार, आदित्यने इरफानविरुद्ध तक्रार दाखल करण्याच्या बदल्यात महिलेला 5 लाख रुपयांची लाच देऊन आमिष दाखवले. इरफानला खोट्या प्रकरणात गोवून 3 कोटी रुपये उकळण्याचा कट होता, असा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात नागपूर तहसील पोलिसांनी अदित्यचा शोध घेतला. अखेरीस त्याला उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT












