बर्थडे पार्टीच्या बहाण्याने खोलीत बोलावलं, ऑर्केस्ट्रात काम करणाऱ्या मुलींवर अत्याचार

मुंबई तक

• 08:00 AM • 04 Nov 2026

Crime News : बर्थडे पार्टच्या बहाण्याने ऑर्केस्ट्रात काम करणारी तरुणीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणात डान्स करण्याच्या बहाण्याने पीडितेला बोलावले. त्यानंतर घटनास्थळी सात तरुण उपस्थित होते.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वाढदिवसच्या पार्टीत दोन तरुणींना डान्स करण्याच्या बहाण्याने बोलावलं

point

डान्सच्या नावाखाली खोलीत ओढून केले लैंगिक अत्याचार 

Crime News : बिहारच्या नालंदा जिल्ह्यात मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बर्थडे पार्टच्या बहाण्याने ऑर्केस्ट्रात काम करणारी तरुणीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणात डान्स करण्याच्या बहाण्याने पीडितेला बोलावले. त्यानंतर घटनास्थळी सात तरुण उपस्थित होते. पीडितेनं आरोप केला की, कार्यक्रमादरम्यान तिच्यासोबत आलेली तरुण तिथून गेली असता, त्या तरुणांनी लैंगिक अत्याचार केल. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांच्या जीवनात प्रेम वाढेल, जाणून घ्या 12 राशींची स्थिती

वाढदिवसच्या पार्टीत दोन तरुणींना डान्स करण्याच्या बहाण्याने बोलावलं

घटनेची माहिती मिळताच, शिवपुरी परिसरात एका भाडेतत्त्वाच्या खोलीत तरुण राहत होते. या खोलीचा मालक तिथे राहत नाही. सांगितले गेले की, त्याच तरुणांपैकी एकाचा वाढदिवस होता. याच निमित्ताने पार्टीचे नियोजन केले होते. त्यांनी ऑर्केस्ट्रात काम करणाऱ्या दोन तरुणींनी बोलावले होते. पीडित तरुणीच्या माहितीनुसार, जेव्हा त्या दोघीही घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा सातजण तिथे होते. 

डान्सच्या नावाखाली खोलीत ओढून केले लैंगिक अत्याचार 

घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेनं सांगितलं की, तिला डान्स करण्याच्या नावाखाली खोलीत बोलावले, नंतर तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली होती. सातपैकी दोघींनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची माहिती पीडितेनं दिली होती. तिच्यासोबत आणखी तरुणी होती, मात्र ती या घटनेदरम्यान घटनास्थळावरून पळून गेली, 

या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. डीसीपी-1 अमरनाथ आणि लहेरी ठाणाध्यक्ष अनिल कुमार पांडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. पथकाने घटनास्थळावर जाऊन तपास केला होता. पोलिसांनी तरुणींनी सुरक्षितपणे ठाण्यात गेले. तिथे त्यांची चौकशी करण्यात आली. 

हे ही वाचा : पत्नीचे अफेयर अन् सासूचा लेकीला पाठिंबा, संशयातून जावयाचा महिलेवर गोळीबार

पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात सामील असणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.