Nanded Crime : कुवरचंद मंडले - नांदेड येथे पत्नीच्या खून प्रकरणात आरोपीने पोलीस कोठडीत जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुशील हैबते अशी आरोपीची ओळख समोर आली. सुशीलने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील बाथरूममध्ये गळफास घेत जीवन संपवलं. सुशील हबैतला पत्नी छाया हबैतच्या खून प्रकरणात अटक केली होती. तो नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक विभागाला पाचारल केले. या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली, तसेच प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलीस ठाण्याच्या आवारात आरोपीने जीवन संपवल्याने परिसर हादरून गेला. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मोबाइल हॅक करून बनवले अश्लील व्हिडिओ, पालकांच्या फोनवर शेअर केले अन्..
पत्नी छायाचा खून पती सुशील हबैतने केला
पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 3.15 वाजेच्या सुमारास धनेगाव परिसरात विटभट्टीवर एका महिलेनं फाशी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण आणि त्यांच्या पथकराने घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता, मयत छाया सुशील हबैत हिची बहीण दीक्षा कांबळेनं आपली बहीण छायाचा खून सुशीलनेच केल्याची माहिती दिली.
पत्नीचा ओढणीच्या लेसने गळा आवळून केली हत्या
पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी सुशील हैबते याला ताब्यात घेण्यात आले असता, त्याने पत्नीचा ओढणीच्या लेसने गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. पत्नीच्या खुनाबाबत सांगितल्यानंतर आरोपी सुशील हैबते याला पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीत ठेवण्यात आले. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:10 वाजेच्या सुमारास जुन्या इमासरीच्या संडासच्या शेजारील खोलीत बसलेल्या इतर तपासात आरोपींना शेख अफरोज शेख शब्बीव आझम खान गोस खान यांनी आरडाओरड केली असता, घटनेची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, सुशील हैबते याने संडासच्या खिडकीच्या अँगलला वायरच्या साहाय्याने गळफास घेतलेला आढळला.
हे ही वाचा : आईच्या लिव्ह-इन पार्टनरने 5 वर्षाच्या मुलाचा केला मर्डर
पतीनं तुरुंगातच संपवलं जीवन
पत्नीचा खून केल्यानंतर घाबरून, घटनेच्या पश्चात्तापाने अथवा अटकेच्या भीतीने आरोपी सुशील हैबते याने आत्महत्या केल्याचे पोलीस जबाबात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पत्नीच्या खुनाबाबत गुन्हा नोंद क्रमांक 1418 / 2026 कलम 103 1 बीएनएस आणि संशयिताच्या आत्महत्येबाबत आकस्मिक मृत्यू क्रमांक 95 / 2026 कलम 194 बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सुगावे ह्या करीत आहेत.
ADVERTISEMENT












