डोंबिवली: किरकोळ वादातून मित्राला संपवलं, तरुण स्वप्नात येऊन छळू लागला अन्..

मिथिलेश गुप्ता

• 07:12 PM • 03 Nov 2026

Dombivali Crime News : डोंबिवली पश्चिमेत मोठा गावातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मित्रानेच आपल्या मित्राची दुर्दैवीपणे हत्या केल्याची घटना आहे. हत्या केलेल्या तरुणाच्या स्वप्नात मृत मित्र येत असल्याचं तरुणाचे म्हणणे आहे.

Dombivali Crime News

Dombivali Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दोन मित्र दारू प्यायल्यानंतर किरकोळ कारणावरून वाद 

point

मित्रानेच मित्राची केली हत्या

Dombivali Crime News : डोंबिवली पश्चिमेत मोठा गावातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मित्रानेच आपल्या मित्राची दुर्दैवीपणे हत्या केल्याची घटना आहे. विशाल कदम अशी मृत तरुणाची ओळख आहे, तर ज्या तरुणाने हत्या केली त्याची प्रभू करकडे अशी ओळख समोर आली. दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता आणि त्याच वादाचे मारहाणीत रुपांतर झाले आणि तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेला काही दिवस झालेत, मात्र तरुण प्रभू करकडेला झोप येत नाही. विशाल प्रभू सारखा स्वप्नात यायचा, त्यानंतर प्रभूने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि प्रकार सांगितला आणि घटनेची माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नांदेड : पत्नीच्या हत्येत नवरा अटक, पोलीस ठाण्यातच संपवलं जीवन

 किरकोळ कारणावरून वाद मित्रानेच मित्राची केली हत्या

डोंबिवली पश्चिमच्या मोठा गावात दोन मित्र एकाच घरात दारू प्यायले होते. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून मोठा वाद झाला. वाद इतका टोकाचा होत गेला की, विशाल कदमने प्रभू करकडेची हत्या केली. हत्येनंतर प्रभूने घरमालक संदीप म्हात्रे याला घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. घरमालक संदीप, यांनी प्रभुला सांगितलं की तुझं अजून विवाह झाला नाही, आता तुझं आयुष्य बरबाद होणार असं तो म्हणाला होता. 

मृतदेह खाडीच्या किनारी फेकला 

त्यानंतर संदीप आणि विशालने मिळून तो मृतदेह हा एका गोणीत भरून खाडीच्या किनारी फेकून दिला होता. या घटनेनंतर तब्बल 20 दिवस प्रभू हा विशालच्या स्वप्नात येत होता. त्यानंतर विशालने क्राइम ब्रांच पोलिसांकडे धाव घेतली होती आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणात क्राईम ब्रँच पोलिसांनी प्रभू करकडे, याला ताब्यात घेऊन विष्णूनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. 

हे ही वाचा : मोबाइल हॅक करून बनवले अश्लील व्हिडिओ, पालकांच्या फोनवर शेअर केले अन्..

यानंतर विष्णूनगर पोलिसांनी विशाल कदम, हत्या प्रकरणी आरोपी प्रभू करकडे, आणि घरमालक संदीप म्हात्रे, यांना अटक केली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्राचाच जीव घेतल्याची ही घटना डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरत आहे.