ज्याला मुलगा समजलं तो निघाला मुलगी, बोलता-बोलता इन्स्पेक्टरला 10 लाखांचा गंडा

मुंबई तक

• 08:33 AM • 27 Oct 2026

हैदराबादमधील एका इन्स्पेक्टरला 10 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 'चंदना'शी लग्न लावण्याचे आमिष दाखवून त्याला लुटण्यात आले.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

इन्स्पेक्टरला घातला दहा लाखांचा गंडा

point

लग्नाच्या अमिषाने लुबाडणूक

Crime News : हैदराबादमध्ये सोशल मीडियावर एका तरुणीच्या नावाने बनावट अकाऊंट बनवून डॉक्टर, व्यावसायिक, प्राध्यापक आणि एका पोलीस इन्स्पेक्टरसह 82 जण हनीट्रॅपमध्ये अडकले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्याकडून लाखो रुपयांची वसुली करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. के. पवन कुमार असे या आरोपीचे नाव असून, तो कुकटपल्लीचा रहिवासी आहे. त्याने 'चंदना' नावाच्या खोट्या नावाने 13 इन्स्टाग्राम आणि 14 फेसबुक अकाऊंट्स तयार करून 1 हजाराहून अधिक लोकांशी संपर्क साधला होता आणि चॅटिंगद्वारे अनेकांची खासगी छायाचित्रे व व्हिडिओ मिळवले होते.

हे वाचलं का?

25 लाख रुपये उकळले

हा आरोपी पीडितांना त्यांची खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याची किंवा पोलीस केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत असे. या माध्यमातून त्याने गेल्या काही वर्षांत 25 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम उकळली होती. या जाळ्यात 22 वर्षांच्या एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्याकडून 4 लाख रुपये उकळल्याची तक्रार आल्यानंतर सैदाबाद पोलिसांनी तपास करून पवनला अटक केली असून सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचा : मुलांच्या भांडणातून वाद; महिलेने दीराच्या गुप्तांगाला घेतला चावा, 55 टाके

'चंदना'शी लग्न लावून देतो

या प्रकरणात एका पोलीस इन्स्पेक्टरची पत्नी पुढे आली असून, आरोपीने इन्स्पेक्टरला 'चंदना'शी लग्न लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 10 लाख रुपये उकळल्याची तक्रार नोंदवली आहे. या रॅकेटमध्ये देशांतर्गत विविध राज्यांतील 24 जण आणि 9 परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याचे समोर आले असून, पोलीस या संपूर्ण नेटवर्कचा आणि अन्य साथीदारांचा कसून शोध घेत आहेत.

हे ही वाचा : मुंबईची खबर : समुद्र असूनही मुंबईतील हवा इतकी प्रदूषित का? पर्यावरण शास्त्रज्ञ काय सांगतात?

सोशल मीडियापासून सावधान 

या घटनेनंतर नागरिकांनी सोशल मीडियावर कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवू नये आणि खासगी माहिती किंवा छायाचित्रे शेअर करू नयेत, असा मोठा बोध मिळतो. जर कोणी अशा प्रकारे ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्यास, न घाबरता चॅट, प्रोफाईल लिंक्स आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे गोळा करून त्वरित सायबर क्राईम किंवा पोलिसांकडे तक्रार करावी.