लातूर: नाल्यात फेकले नवजात बालक, ग्रामस्थांनी वाचवला जीव

मुंबई तक

• 05:30 PM • 27 Oct 2026

Latur Crime : लातूरमधून मनाला सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कडेला महामार्गाशेजारी असणाऱ्या एका नाल्यात नवजात बाळाला फेकल्याची दुर्दैवी घटना आहे.

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लातूरमधून मनाला सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार

point

लहान बाळाला नाल्यातून काढले बाहेर 

Latur Crime : अनिकेत जाधव - लातूरमधून मनाला सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कडेला महामार्गाशेजारी असणाऱ्या एका नाल्यात नवजात बाळाला फेकल्याची दुर्दैवी घटना आहे. ही घटना लातूरच्या शिरुर ताजबंद गावातील आहे. याच ठिकाणी एका राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्यालगत अज्ञात व्यक्तीने नवजात बाळाला एका नाल्यात फेकून दिल्याची घटना आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : विधान परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE : पोस्टल मतांमध्ये प्रतापसिंह पाटील आघाडीवर

लहान बाळाला नाल्यातून काढले बाहेर 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री जोराचा गारठा जाणवत होता, यामुळे लहान बाळ जोरात रडत होते. अशातच शेजारहून जाणाऱ्या काही लोकांना लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला, तर त्यांनी त्या लहान बाळाला नाल्यातून बाहेर काढले. तसेच एका सरकारी रुग्णालयात दाखल केले. सरकारी रुग्णालयात उपचार केल्यानंतर नवजात बाळाला लातूर शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. 

बाळाची सध्या प्रकृती स्थिर

अशातच लहान बाळाची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. या नवजात पुरुष बाळाला फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा चाकूर पोलीस तपास करत आहे. दरम्यान, नवजात बाळाला वाऱ्यावर सोडून देणे, तसेच त्यांचे संगोपन न करणे या प्रकरणात अतिशय वाढ होऊ लागली आहे. याला जोडपे जबाबदार आहेत, की त्यांच्यातील जबाबदारी न घेणारी वृत्ती जबाबदार आहे असा प्रश्न उपस्थित होतो. 

हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना! मिळणार 'ऐवढे' पैसे? 

यामुळे आता नवजात बाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. जे जन्माला घालतात तेच लोक नवजात बाळाचे संगोपन करू शकत नाही, अशामुळे या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.