अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन आरोपी ताब्यात

मुंबई तक

• 09:00 AM • 28 Oct 2026

Crime News : एका अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आणि छापला जिल्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दोन तरुणांनी पीडितेवर केला लैंगिक अत्याचार 

point

महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Crime News : बिहारच्या छपरा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. इसुआपुर ठाणे क्षेत्रात गावातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा दुर्दैवी प्रकार आहे. बुधवारी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आणि छापरा जिल्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अटकेत असलेल्या आरोपीची नीतीश कुमार महतो, ओमप्रकाश महतो आणि अनूप कुमार प्रसाद अशी ओळख समोर आली.   

हे वाचलं का?

हे ही वाचा : फुलंब्रीत महिला रुग्णावर कथितरित्या बलात्कार, डॉक्टर आणि BJP शहराध्यक्ष अटकेत

दोन तरुणांनी पीडितेवर केला लैंगिक अत्याचार 

प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पीडिता बाजारातून सामान खरेदी करून पायी घरी परतला होता. यादरम्यान एका वडाच्या झाडाजवळ तीन तरुणांना पकडण्यात आले होते. संबंधित प्रकरणात आरोप असाय की, दोन तरुणांनी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आणि यासाठी आणखी एकजण तिथे उपस्थित होता. 

या प्रकरणात एसडीपीओ-2 मढौरा संजय कुमार सुधांशुच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक छापेमारी करून तीन आरोपींना अटक करण्यात आली. छापेमारीत असलेल्या पथकात इसुआपुर ठाणाध्यक्ष धीरेंद्र कुमार, अपर ठाणाध्यक्ष अंकित कुमार ओझा सहित पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोलिसांनी पीडितेला तिचा जबाब नोंदवण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा संहितेच्या कलम 183 अंतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी छपरा येथे पाठवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.  

हे ही वाचा : नवी मुंबई: प्रेयसीसाठी बदललं नाव, दुर्लक्ष केल्यानं प्रियकरानं चाकूने वार करत तरुणीला संपवलं

महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

महिलांवर आणि मुलींवर देशात सातत्याने लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.