विरार : बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड

विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Virar News
Virar News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विरारमध्ये खळबळ

point

एकाच फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह

point

नेमकं काय घडलं?

Virar News : विरार पश्चिममधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील ग्लोबल सिटी परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये दोन भाऊ आणि त्यांची बहिण यांचा समावेश आहे. हे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या तिन्ही भावंडांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.

शेजाऱ्यांना दुर्गंधी आली अन्...

ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर बोलिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फ्लॅटचा दरवाजा उघडला, जिथे तिघांचे मृतदेह आढळून आले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या कुटुंबातील एक भाऊ कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होता आणि हे कुटुंब सध्या मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत होते.

हे ही वाचा : “डिलीटेंद्र..”, नागपूरमध्ये काँग्रेसचा विजय होताच महाराष्ट्र काँग्रेसचं फडणवीसांना प्रत्युत्तर

मृत्यूपूर्वी केला व्हिडीओ

पोलीस तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, मृत्यूपूर्वी एका भावंडाने आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये आत्महत्येचा स्पष्ट उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सध्या हा व्हिडिओ आणि घटनास्थळावरील इतर पुराव्यांची कसून चौकशी करत आहेत.

हे ही वाचा : नागपूर पदवीधर : शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने गेम पलटवला, अन् सपकाळांनी फडणवीसांना डिवचलं

पोस्ट मार्टममध्ये काय?

पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतर आणि सखोल तपास पूर्ण झाल्यावरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.