प्रेमसंबंधामुळे तरुणीचे कुटुंब संतप्त, तरुणासह वडिलांची नग्नवस्थेत काढली धिंडं

Crime News : एका तरुणीसोबत प्रेमसंबंधातून संतप्त कुटुंबीयांनी तरुणाला आणि त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली, त्याचे कपडे काढून त्यांची रस्त्यावरून धिंड काढली. या घटनेप्रकरणी तरुणीचे वडील आणि मामा यांच्यासह तिघांनाही अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुण आणि तरुणीला एकत्र पकडले 

point

तरुणासह वडिलांची रस्त्यावरून नग्नवस्थेत धिंड काढली

Crime News : कोलकाताच्या बेहाल परिसरातून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीसोबत प्रेमसंबंधातून संतप्त कुटुंबीयांनी तरुणाला आणि त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली, त्याचे कपडे काढून त्यांची रस्त्यावरून धिंड काढली. या घटनेप्रकरणी तरुणीचे वडील आणि मामा यांच्यासह तिघांनाही अटक करण्यात आली. ही घटना रविवारी सरसुना पोलीस ठाणे परिसरातील बसुंधर पार्क येथील आहे. 

हे ही वाचा : हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच बँक मॅनेजरची पत्नी कोसळली, 6 सेकंदात मृत्यू

संबंधित प्रकरणात घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतप्त लोकांनी महिलेच्या घराची तोडफोड केल्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. 

तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुण आणि तरुणीला एकत्र पकडले 

या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, तरुणीच्या कुटुंबीयांनी त्या तरुण आणि तरुणी एकत्र पकडले. त्यानंतर पुरुषाला घरात कोंडून ठेवले. महिलेच्या वडिलांनी आणि मामांना तरुणाच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासातून समोर आले की, त्या पुरुषाच्या वडिलांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. 

तरुणासह वडिलांची रस्त्यावरून नग्नवस्थेत धिंड काढली

अशातच अधिकाऱ्यानी सांगितलं की, कुटुंबीयांनी त्या तरुणाच्या वडिलांना एक बंदुक दिली होती. त्यानंतर त्यांना धमकी देऊन दोन पर्याय ठेवले, एकतर आपल्या तरुणाला ठार करा किंवा रस्त्यावर नग्न फिरावं, असे सांगितले. संबंधित प्रकरणात आरोप केला की, त्या तरुणासह त्याच्या वडिलांची रस्त्यावरून नग्नवस्थेत धिंड काढण्यात आली. 

हे ही वाचा : मुंबई: क्रूर बापानं नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं

पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले की, त्या तरुणाचत्या एका मित्रावरही अशाच प्रकारे हल्ला करून त्याचा अपमान करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला एक वेग मिळाला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.