जेवणाचे आमिष दाखवले, लॉजवर नेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार

crime news : दोन अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात आरोप केला की, घरातून अल्पवयीन दोन्ही मुलींना जेवणाचे आमिष दाखवून आपल्यासोबत घेऊन गेला आणि एका लॉजमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जेवणाचे आमिष दाखवले

point

लॉजवर नेलं आणि दोन अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक शोषण

Crime News : तामिळनाडू येथील वेलंकन्नी येथे दोन अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात आरोप केला की, घरातून अल्पवयीन दोन्ही मुलींना जेवणाचे आमिष दाखवून आपल्यासोबत घेऊन गेला आणि एका लॉजमध्ये तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना केरळहून अटक करण्यात आले. अटकेत आलेल्यांची अँथनी आणि विशाल अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : बीडच्या 13 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन

आई वडिलांशी वाद घालून घरातून बाहेर पडल्या मुली

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही मुलींनी आई वडिलांशी वाद घालून घरातून बाहेर पडल्या होत्या. यानंतर वेलंकन्नीच्या समुद्र तटावर बसल्या होत्या, अशी माहिती आहे. यादरम्यान त्यांनी अजूबाजूला दुकानावर काम करण्यासाठी शोध घेणे सुरु ठेवला होता. दुकानदारला त्यांच्या परिस्थितीची जाणीव लक्षात आली, त्यानंतर त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

तरुणांनी जेवण देण्याच्या बहाण्याने मुलींना लॉजवर नेत केले अत्याचार 

या घटनेची माहिती मिळाल्यास पोलिसांनी दोन्ही मुलींचा शोध घेतला, नंतर चौकशीदरम्यान मुलींनी आरोप केला की, दोन तरुणांनी जेवण देण्याच्या बहाण्याने एका लॉजमध्ये घेऊन गेले होते, तिथेच दोघांसोबतही लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. पीडित मुलींच्या जबाबानुसार, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. नंतर दोघांना केरळ येथून अटक करण्यात आली.  

हे ही वाचा : लातूर: 11 वर्षीय मुलीचा थंडी- तापाने उपचारादरम्यान मृत्यू, कुटुंबीयांनी डॉक्टरांना धरलं धारेवर

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी केली होती. यानंतर त्यांना आई वडिलांकडे सोपवले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.