तरुणाचे मुलीशी तुटले नाते, रागात प्रियकराने प्रेयसीच्या आईची केली हत्या
Crime News : तरुणाचे प्रेयसीशी नातेसंबंध तुटल्याने त्याने तिच्या आईची हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संबंधित प्रकरणात आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणाचे प्रेयसीशी नातेसंबंध तुटले
नंतर रागाच्या भरात तरुणीच्या आईला संपवले
Crime News : प्रियकराचे मुलीशी नातेसंबंध तुटल्याने संतप्त झालेल्या तरुणाने कथितरित्या एका कुटुंबावर हल्ला केला, त्या हल्ल्यात मुलीच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. मुलीची आई मेरी रेगिला हिची हत्या, नंतर वडील मुथुकृष्णन यांना जखमी करणे आणि कुटुंबाच्या दोन मुलींचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे. ही घटना तामिळनाडूच्या थुथुकडी येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : सुरक्षा रक्षकाने मुक्या जनावराला शालीत गुंडाळलं, केबिनमध्ये केला अत्याचार
तरुणाचे प्रेयसीशी नातेसंबंध तुटले
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे 15 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी विरोध केला असता, त्यांनी हा गुन्हा केल्याचा आरोप केला. पोलिसांनी दोन्ही मुलींना सुखरूप ताब्यात घेतले, परंतु आरोपीला अद्याप अटक केली नाही. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी ज्ञानप्रकाश याचे एका 15 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या लहान वयामुळे तिच्या कुटुंबीयांनी विवाहाला मान्यता दिला नाही. असेही वृत्त आहे की, कुटुंबीयांनी संमतीअभावी हे संबंध पुढे जाणार नाहीत, असे सांगितले. नंतर मुलीने देखील याबाबत आरोपीला माहिती दिली होती.
तरुणाने कुटुंबावर हल्ला करत मुलीच्या आईला संपवले
घडलेल्या घटनेनुसार, यामुळे आरोपी संतापला असता, पोलिसांना संशय आला की, याच रागामुळे त्याने मुलीच्या कुटुंबाला लक्ष केले. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, नातेसंबंध संपल्यामुळे संतप्त झालेल्या ज्ञानप्रकाशमने शस्त्रांसह मुलीच्या घरात प्रवेश करून कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात मुलीची आई, मेरी रेगिला, ठार झाली, तर तिचे वडील, मुथुकृष्णन जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर आरोपी दोन्ही मुलींना घेऊन आपल्या गाडीतून फरार झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मुलींचा शोध घेणे सुरू ठेवले आणि सुखरूप शोध घेण्यात यश मिळवले.
हे ही वाचा : बीडच्या 13 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन
या प्रकरणात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कुटुंबावर हल्ला करून मेरी रेगिलाची हत्या केली आणि तिच्या वडिलांना जखमी केले होते. त्यांनी सांगितलं की, अपहरण झालेल्या दोन्ही मुलींची पोलीस पथकाने सुखरूप सुटका केली. प्राथमिक तपासातून समोर आले की, प्रेमप्रकरण आणि कौटुंबिक वादाला विरोध असल्याचे समोर आले. या प्रकरणी एफआरआय दाखल केला. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, आरोपी ज्ञानप्रकाशमला अद्याप अटक केलेली नाही.
