Crime News : एका क्षुल्लक कारणावरून एक अत्यंत भीषण आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादानंतर चुलत्याने आपल्या 16 वर्षीय पुतणीवर कुऱ्हाडीने तब्बल ४० वार करून तिची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात नातीला वाचवण्यासाठी धावलेली तिची आजी देखील गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. राजस्थानच्या दीदवाना जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
चुलता-पुतणीमध्ये वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (27 ऑक्टोबर) दुपारी आरोपी ओमप्रकाश (वय 40) हा कुऱ्हाड घेऊन चुलत भाऊ भूराराम यांच्या घरी पोहोचला. त्या वेळी मृत अल्पवयीन मुलगी अक्षिता घरात एकटीच होती, तर तिची आई शेतात आणि वडील मजुरीसाठी परगावी गेले होते. यादरम्यान, कोणत्यातरी क्षुल्लक कारणावरून आरोपी आणि अक्षिता यांच्यात वाद झाला, ज्याचा राग आल्याने आरोपीने संतापाच्या भरात तिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.
हे ही वाचा : विधान परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE : नागपूर पदवीधर मतदारसंघ मतमोजणी महत्वाची अपडेट
आजीवरही केला हल्ला
नातीच्या किंकाळ्या ऐकून तिला वाचवण्यासाठी आलेली आजी तुलछा देवी यांच्यावरही आरोपीने जीवघेणा हल्ला केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच पोलीस आणि FSL Team तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
हे ही वाचा : सुवर्णपदक विजेता नीरज यादवने संपवलं आयुष्य; अॅथलेटिक्सने का उचललं एवढं टोकाचं पाऊल?
आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान, पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम राबवली असता, आरोपीने शेतात कीटनाशक (विष) प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी ओमप्रकाश याला बेशुद्ध अवस्थेत ताब्यात घेऊन तातडीने दवाखान्यात दाखल केले, जिथून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मोठ्या हॉस्पिटमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












