मेहुण्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, बहिणीचा काटा काढण्यासाठी रचला थराराक कट, अखेर काय घडलं?

मुंबई तक

• 12:32 PM • 29 Oct 2026

मेहुणीच्या प्रेमात पडलेल्या रामगडमधील एका व्यक्तीने आपल्याच बायकोची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधातून बायकोची हत्या

point

नवऱ्यासह मेहुणीला अटक

Crime News : एका महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 17 ऑक्टोबर रोजी 34 वर्षीय जेबा परवीन यांचा मृतदेह त्यांच्याच घरात आढळला होता. सुरुवातीला घरात कोणी नसताना हा अपघात आहे की घातपात, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. मात्र, कसून चौकशीअंती पोलिसांनी मृत जेबाचा नवरा गुलाम सरवर ऊर्फ राजन आणि त्याची मेहुणी नेहा परवीन यांना अटक केली आहे. या दोघांमधील कथित प्रेमसंबंध आणि सततच्या वादातूनच हा खून झाल्याचा खळबळजनक दावा पोलिसांनी केला आहे. झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

घटना घडली त्या दिवशी जेबा घरात एकटीच होती. त्यांची दोन्ही मुले (14 वर्षांचा मुलगा आणि 12 वर्षांची मुलगी) ट्यूशनला गेली होती, तर पती गुलाम सरवर कामानिमित्त रांचीला गेले होते. सुरुवातीला घरात कोणतीही दरोड्याची किंवा छेडछाड झाल्याची चिन्हे नव्हती, त्यामुळे घसरून पडल्याने डोक्याला मार लागल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, जेबाच्या भावाने हत्येची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. एफएसएल (FSL) टीमची मदत घेत आणि वैद्यकीय मंडळाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शवविच्छेदनानंतर या प्रकरणाचे गूढ उलगडण्यास सुरुवात झाली.

हे ही वाचा : “डिलीटेंद्र..”, नागपूरमध्ये काँग्रेसचा विजय होताच महाराष्ट्र काँग्रेसचं फडणवीसांना प्रत्युत्तर

अनैतिक संबंधांचा उलगडा

तपास पुढे सरकला तशी पती गुलाम सरवरची संशयास्पद विधाने पोलिसांच्या लक्षात आली. कसून चौकशीत समोर आले की, गुलाम सरवर आणि नेहा परवीन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. या अनैतिक संबंधांमुळे घरात सतत खटके उडत असत आणि वाद होत असत. याच वादातून जेबाला आपल्या मार्गातून हटवण्याचा कावा या दोघांनी रचला. हत्येच्या दिवशी जेबाचे डोके वारंवार भिंतीवर आदळत तिचा अत्यंत क्रूरपणे जीव घेण्यात आला, अशी कबुली दोन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान दिली असल्याची माहिती एसडीपीओ आलोक रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे ही वाचा : विरार : बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड

थरारक हत्याकांड

या दुर्दैवी घटनेमुळे जेबाच्या दोन निष्पाप मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले असून, दोन्ही मुले धक्क्यात आहेत. जेबाचे मामा मोहम्मद संजर यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूपासून सुरू झालेला हा प्रवास आता एका थरारक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या हत्याकांडाच्या सत्यापर्यंत पोहोचला असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून न्यायिक कोठडीत पाठवले आहे.