Crime News : एक अतिशय संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका 23 वर्षीय विवाहितेने आपल्याच दीरावर जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी पीडितेने आपली आई आणि आजीसोबत पोलीस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
गच्चीवर गेली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता मूळची मोरेना येथील असून, तिचा विवाह 27 मे 2025 रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. लग्नानंतर तिला पतीची किडनी खराब असल्याचे समजले. दरम्यान, 28 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री दहाच्या सुमारास ती गच्चीवरून कपडे आणण्यासाठी गेली असता, आरोपी दीर कमल याने जीन्याचा दरवाजा बंद करून तिच्यावर बळजबरी केली आणि गच्चीवरील खोलीत नेऊन जीवे मारण्याच्या धमकी देत बलात्कार केला.
हे ही वाचा : “डिलीटेंद्र..”, नागपूरमध्ये काँग्रेसचा विजय होताच महाराष्ट्र काँग्रेसचं फडणवीसांना प्रत्युत्तर
'असं' बाहेर आलं प्रकरण
घटनेनंतर आरोपीने पीडितेला याबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि 2 मार्च रोजी तिला माहेरी मोरेना येथे सोडून आला. भीती आणि सामाजिक बदनामीच्या शक्यतेमुळे ती काही काळ शांत राहिली; परंतु आईने सतत विचारणा केल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पावले उचलत थाटीपूर पोलीस गाठले आणि तक्रार दिली.
हे ही वाचा : फ्री फायरवरुन भयंकर 'गेम', अल्पवयीन मुलगी तरुणाच्या जाळ्यात अडकली, पुढं काय घडलं?
दीर फरार
पोलीस प्रशासनाने पीडितेच्या तक्रारीवरून तात्काळ गुन्हा नोंदवला असून, पोलिसांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. सध्या पोलीस फरार आरोपी कमलचा कसून शोध घेत असून, या गंभीर घटनेचा सर्व बाजूने सखोल तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












