'आई, मला त्रास होतोय...' आजोळी गेलेल्या 12 वर्षीय मुलीसोबत काय घडलं? मामीला अटक

मुंबई तक

• 01:54 PM • 30 Oct 2026

मोगा परिसरातील एका मामीने आपल्या भाचीसोबत असं कृत्य केलं की सगळे हादरुनच गेले. याप्रकरणी आरोपी मामीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नात्याला काळिमा फासणारी घटना

point

12 वर्षीय मुलीवर बलात्कार

Crime News : नात्यांना काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका निर्दयी मामीने आपल्याच भाचीसोबत एक भयंकर कृत्य केले. पतीच्या दोन मित्रांना तिने आपल्या 12 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार करायला लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच संताप उसळला असून, सर्वसामान्यांतून हळहळ व्यक्त होत आहे. पंजाबच्या मोगा परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

लैंगिक अत्याचाराचं व्हिडीओ चित्रीकरण

आजीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या अल्पवयीन मुलीला मोगा येथील तिच्या मामाच्या घरी काही दिवसांसाठी पाठवण्यात आले होते. तिथे असताना, आरोपी महिलेच्या सांगण्यावरून तिच्या दोन मित्रांनी (जोरा सिंह आणि काका सिंह) या निष्पाप मुलीवर अत्याचार केला. एका रात्री आरोपींनी घरातच हे कृत्य केले, तर दुसऱ्या आरोपीने अत्यंत लाजीरवाणी कृती करत या संपूर्ण अत्याचाराचा अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला.

हे ही वाचा : अजित पवार यांच्या NCP मधील इनसाईड स्टोरी, नेमकं काय घडतंय?

ब्लॅकमेल करुन अत्याचार

हा काळाबाजार इथेच थांबला नाही, तर नराधमांनी या व्हिडिओच्या जोरावर मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. कोणाला सांगितल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू ठेवला. याच धमक्यांच्या जोरावर 15 सप्टेंबर 2026 रोजी मुख्य आरोपी जोरा सिंह याने पुन्हा एकदा त्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून दुष्कर्म केले.

हे ही वाचा : अश्लील व्हिडिओ, डाउनलोड हिस्ट्रीचा तपास; मुलींच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश

प्रकरण बाहेर कसं आलं?

सततच्या या भयंकर त्रासामुळे गांगरून गेलेल्या अल्पवयीन मुलीने अखेरीस धाडस करून घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीचे शब्द ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी महिलेसह तिन्ही नराधमांविरोधात विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत.