वहिनीसोबत अनैतिक संबंध, पत्नी करायची विरोध..., पुढे काय घडलं?

मुंबई तक

• 09:11 AM • 31 Oct 2026

Crime News : वहिनीसोबत कथित अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नी अनामिकाचा छळ केल्याचा धर्मेंद्र तिवारीवर आरोप होता. कौशांबी न्यायालयाने पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेप आणि 23 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वहिनीसोबत अनैतिक संबंध, पत्नी करायची विरोध..., पुढे काय घडलं?

point

पत्नी अनामिकाचा छळ केल्याचा धर्मेंद्र तिवारीवर आरोप होता

UP Crime News : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात पत्नीच्या हत्येच्या सुमारे 15 वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. धर्मेंद्र तिवारी ऊर्फ पप्पू असे दोषी ठरवण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 23 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. धर्मेंद्रचे त्याच्या वहिनीसोबत कथित अनैतिक संबंध होते आणि त्याची पत्नी अनामिका या संबंधांना विरोध करत होती, असा आरोप होता. याच कारणावरून अनामिकाला त्रास दिला जात असल्याचेन्यायालयात सांगण्यात आले. अखेर 28 ऑक्टोबर 2026 रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन कन्व्हिक्शन’ अंतर्गत या खटल्यात प्रभावी बाजू मांडण्यात आली. पत्नीच्या हत्येनंतर पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचाही धर्मेंद्रवर आरोप होता.

हे वाचलं का?

जवळपास दीड दशक न्यायालयात या खटल्याची सुनावणी

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील सैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौरई बुजुर्ग गावातील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर 2011 रोजी धर्मेंद्र तिवारी याने पत्नी अनामिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लूट आणि तिच्या अपहरणाची माहिती दिली होती. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणातील पुरावे गोळा केले. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे धर्मेंद्रविरोधात कारवाई करण्यात आली. तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित कलमांनुसार आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. सुरुवातीला लूट आणि अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासातून या प्रकरणातील महत्त्वाचे तपशील समोर आले. जवळपास दीड दशक न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती.

हेही वाचा : "आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीला जाऊ नये", संजय गायकवाड पुन्हा बरळले

वहिनीसोबत कथित अनैतिक संबंध, अन् पत्नीची क्रूरपणे हत्या

न्यायालयात मांडलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र आपल्या पत्नीला उपचारासाठी सिराथू येथे घेऊन गेला होता. त्याचे वहिनीसोबत कथित अनैतिक संबंध होते आणि अनामिका त्याला विरोध करत होती. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचा तसेच अनामिकाला त्रास दिला जात असल्याचा आरोप होता. उपचारासाठी सिराथू येथे नेल्यानंतर परत येताना अनामिकाची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचेही अभियोजन पक्षाने म्हटले. 

सरकारी पक्षाचे वकील सोमेश्वर कुमार तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्रने कट रचून काही व्यक्तींना बोलावले आणि त्यांच्या मदतीने अनामिकाची हत्या घडवून आणल्याचा आरोप होता. अनामिकाच्या भावानेही धर्मेंद्र तिचा सतत छळ करत असल्याचा आरोप केला होता. वहिनीसोबतच्या कथित संबंधांना अनामिकाने विरोध केल्यामुळे तिला त्रास दिला जात असल्याचे तिच्या भावाने सांगितले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने एकूण 12 साक्षीदार न्यायालयात हजर केले.

सन 2011 पासून कौशांबी जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल अखेर 28 ऑक्टोबर 2026 रोजी लागला. न्यायालयाने धर्मेंद्र तिवारी ऊर्फ पप्पू याला पत्नी अनामिकाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर 23 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सोमेश्वर कुमार तिवारी यांनी बाजू मांडली. शासनाच्या ‘ऑपरेशन कन्व्हिक्शन’ अंतर्गत खटल्यात प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला लूट आणि अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर तपास करून पुरावे गोळा केले होते. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राच्या आधारे न्यायालयात सुनावणी झाली. अखेर सुमारे 15 वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात न्यायालयाने पतीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पत्नीच्या हत्येच्या या जुन्या प्रकरणात आलेल्या निकालामुळे धर्मेंद्रला आता जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे.