महिलेचा जीम ट्रेनरवर जीव जडला, पतीला संपवण्याचा कट; पण पुढे काय घडलं?

मुंबई तक

• 06:22 AM • 31 Oct 2026

Crime News : पतीवर चाकूने अनेक वार केल्याप्रकरणी पत्नी प्रिया शर्मा आणि तिचा कथित प्रियकर प्रताप सिंह यांना अटक करण्यात आली आहे. पतीला दोघांच्या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर हल्ल्याचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

महिलेचा जीम ट्रेनरवर जीव जडला

point

पतीला संपवण्याचा कट; पण पुढे काय घडलं?

Crime News : पतीची हत्या करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. शशांक कंथारिया यांच्यावर चाकूने अनेक वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना 26 ऑक्टोबर रोजी गाझियाबादमध्ये  घडली. प्रिया शर्मा असे पत्नीचे नाव असून प्रताप सिंह हा तिचा कथित प्रियकर आहे. प्रताप हा फिटनेस हेडक्वार्टर्स या व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून काम करतो. 

हे वाचलं का?

गाझियाबादमधील वसुंधरा सेक्टर 1 येथील जागृती आरडब्ल्यूए सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, शशांक यांना पत्नी आणि प्रताप यांच्या संबंधांची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोघांनी शशांक यांना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून हल्ल्यासाठी वापरल्याचा संशय असलेला चाकूही जप्त केला आहे.

हेही वाचा : Maharashtra Rain : 'अर्णब' चक्रीवादळाचा कसा परिणाम होणार? मुसळधार पाऊस कधी?

शशांक यांच्यावर चाकूने अनेक वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे 5.15 वाजता प्रिया घरातून व्यायामशाळेत जाण्यासाठी निघाली होती. त्याच वेळी प्रताप घरात शिरला आणि त्याने शशांक यांच्यावर चाकूने अनेक वार केले, असा आरोप आहे. या हल्ल्यात शशांक गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी शशांक यांना उपचारांसाठी यशोदा मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. शशांक यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे इंदिरापुरम पोलिसांनी प्रिया आणि प्रताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचण्यासंबंधीच्या आरोपांचा समावेश आहे.

हेही वाचा : मुंबई : नवरा-बायकोमध्ये वाद, नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला पूलावरुन फेकलं, संपूर्ण परिसर सुन्न

व्यायामशाळेत दोघांमध्ये निर्माण झाले प्रेमसंबंध 

तपासादरम्यान प्रिया आणि प्रताप यांची ओळख कशी झाली, याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रिया गेल्या सात ते आठ महिन्यांपासून फिटनेस हेडक्वार्टर्स या व्यायामशाळेत व्यायामासाठी जात होती. त्याच ठिकाणी प्रशिक्षक असलेल्या प्रतापशी तिची ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. चौकशीदरम्यान प्रतापने दोघांना लग्न करायचे असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, शशांक यांना या संबंधांची माहिती मिळाली होती. दिवाळीनंतर दुसऱ्या सदनिकेत राहायला जाण्याची तयारी शशांक करत होते, असेही पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दोघांनी शशांक यांना संपवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ल्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी सकाळी प्रिया आणि प्रताप यांची धावण्याच्या वेळी भेट झाली होती. या भेटीदरम्यान त्यांनी शशांक यांना संपवण्याबाबत चर्चा केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे प्रताप चाकू घेऊन प्रिया यांच्या घरी पोहोचला. प्रियाने घराचे प्रवेशद्वार आधीच उघडे ठेवले होते आणि त्यामुळे प्रतापला घरात प्रवेश करून शशांक यांच्यावर हल्ला करता आला, असा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या माहितीवरून हल्ल्यात वापरल्याचा आरोप असलेला चाकू जप्त केला आहे. या कथित कटामध्ये प्रिया आणि प्रताप यांची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास इंदिरापुरम पोलीस करत आहेत.