Crime News : बंगळुरूच्या ग्राइंडर डेटिंद अॅपवरून पुरुषाशी झालेली मैत्री महागात पडली आहे. पश्चिम बंगळुरूत चंद्र लेआउट परिसरात डेटवर बोलावलेल्या एका पुरुषावर आणि त्याच्या साथीदारावर अंदाजे 20 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना होणार अचानक आर्थिक लाभ
संबंधित प्रकरणात असा आरोप केला की, दोघींनी पीडितेचा चाकूचा धाक दाखवून गुन्हा केल्यानंतर पलायन केले. पोलिसांनी या प्रकरणी नाझिया आणि सय्यद मोहसिन या दोन संशयितांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला आहे. ही दुर्दैवी घटना 22 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगळूरमधील चंद्र लेआउट परिसरात घडली होती. पोलिसांनी माहितीनुसार, एका व्यक्तीची ओळख ग्राइंडर या लोकप्रिय गे डेटिंग अॅपद्वारे झाली होती. त्याने मित्राच्या अपार्टमेंटमध्ये भेटायला बोलावले होते.
पीडित मुलगी ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती, तेच तिच्या एका मित्राचे होते. अपार्टमेंट चालक आणि पत्नी दोघेही बाहेर गेले आणि चाव्या पीडित मुलीकडे दिलेल्या होत्या. याचदरम्यान, तिने एका डेटिंग अॅपद्वारे एका पुरुषाशी बोलणे सुरु केले, ज्याने तिला त्याच्या घरी भेटायला बोलावले होते.
पीडितेला चाकूचा धाक दाखवून धमकावले
असा आरोप केला की, जेव्हा त्या अभ्यागताने आपला मास्क काढण्यास सुरुवात केली, तेव्हा पीडितेच्या लक्षात आले की, तो एक तृतीयपंथी आहे. मात्र, सुमारे 10 मिनिटांनंतर आणखी एक तृतीयपंथी व्यक्ती तिथे आली. या प्रकरणात असा आरोप आहे की, अपार्टमेंटमध्ये आल्यानंतर त्या दोघांनी पीडितेचा चाकूचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर त्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडून कपाट उघडले.
अंदाजे 226 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन आरोपी फरार
कपाटात सोन्याचे दागिने होते, तेव्हा दोन्ही आरोपी अंदाजे 226 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले. चोरी झालेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत 20 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, अपार्टमेंटचे मालकर आणि त्यांची पत्नी सहलीवर गेली होती. त्यांनी घराच्या चाव्या देखील रहिवाशाला दिल्या होत्या.
हे ही वाचा : पुणे : 18 व्या मजल्यावरून खाली झेपावली आई अन् चिमुरडा लेक, हादरवून टाकणाऱ्या घटनेमागे नेमकं कारण काय?
या घटनेची माहिती मिळताच. घरमालक बंगळुरूत परत आले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आणि आरोपीची ओळख पटल्यानंतर कारवाई केली. पोलिसांनी प्रकरणात लक्ष घालत नाझिया आणि सय्यद मौशिन या दोन संशयितांना अटक केली. प्रकरणाता पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












