मुंबई : मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलांचे 20 हजारांहून अधिक आक्षेपार्ह फोटो अन् व्हिडीओ, 49 वर्षीय व्यक्तीला अटक

दिपेश त्रिपाठी

• 09:33 AM • 08 Nov 2026

बाल लैंगिक शोषणाशी संबंधित धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. 20 हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडीओ बाळगल्याप्रकरणी 49 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Cyber Crime

Mumbai Cyber Crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मालाडमध्ये धक्कादायक प्रकार

point

सायबर पोलिसांची धडक कारवाई

point

49 वर्षीय व्यक्तीला अटक

Mumbai Crime : महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्री बाळगल्याप्रकरणी मुंबईतील मालाड पश्चिमेतून 49 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईल फोनमध्ये तब्बल 20 हजारांहून अधिक आक्षेपार्ह चित्रे आणि व्हिडिओ सापडले आहेत. सायबर विभागाच्या सततच्या डिजिटल पाहणी आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

कसा सापडला आरोपी?

सैफुद्दीन जमीरुद्दीन मलिक (49, रा. मालाड पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा व्यक्ती इंटरनेटवरून बाल लैंगिक शोषण आणि दुर्व्यवहारशी संबंधित डिजिटल सामग्री डाऊनलोड करून आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये साठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्याची ओळख पटवली.

हे ही वाचा : Maharashtra Weather : दिवाळीच्या तोंडावर हवामान बदललं, राज्यावर दुहेरी संकट

फॉरेन्सिक तपासणी

याप्रकरणी नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 294, पॉक्सो कायदा 2012 चे कलम 15 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67 (B) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस सध्या या डिजिटल साहित्याची फॉरेंसिक तपासणी करत असून, ही सामग्री कुठे शेअर केली गेली होती का, याचाही शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा : सोलापूर : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्यावर पहारेने वार, मृतदेह फेकला कालव्यात; न्यायालयाचा मोठा निर्णय

सायबर विभागाचा नागरिकांना इशारा

महाराष्ट्र सायबर विभागाने नागरिकांना असा इशारा दिला आहे की, बाल शोषण विरोधी सामग्री डाऊनलोड करणे, बाळगणे किंवा शेअर करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'सीसीपीडब्ल्यूसी' (CCPWC) आणि 'ट्रेस' (TRACE) सारख्या विशेष यंत्रणा कार्यरत असून नागरिकांनी अशा प्रकरणांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.