Crime News : उत्तर प्रदेशच्या बदोहि जिल्ह्यात ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. दोन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह फासाला लटकवला होता. हत्येला आत्महत्येचं स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर आई-वडिलांच्या मदतीने मृतदेह फासाला लटकवल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : दिवाळीत 'या' राशींवर पैशाचा होणार वर्षाव
गळा दाबून दोन्ही भावांनी बहिणीला संपवलं
उत्तर प्रदेशातील गोपीगंज पोलीस ठाणे परिसरातील जखांव गावातील ही दुर्दैवी घटना आहे. अपर पोलीस अधीक्षक शुभम अग्रवाल यांनी सांगितलं की, खुशी बिंद (वय 21) हीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शुक्रवारी शवविच्छेदनाच्या अहवालाची पुष्टी केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली.
पीडितेच्या पतीकडून तक्रारीच्या आधारावर आरोपींवर गुन्हा
एएसपी शुभम अग्रवाल यांनी सांगितलं की, शवविच्छेदनानंतर अहवाल आला असता, शुक्रवारी पीडितेच्या पतीकडून तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. सरज बिंद (वय 18) आणि 15 वर्षीय अल्पवयीन भावानेच आपल्या बहिणीचा गळा दाबून संपवलं. अशातच भावांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांची बहीण एका तरुणासोबत फोनवर बोलत असायची असा संशय होता. यावरून त्यांच्याच वाद झाला असता, तरुणीचा गळा दाबून दोन्ही भावांनी हत्या केली.
हे ही वाचा : "राजेश खन्ना स्टाइलचे कपडे अन् अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू; दादांशिवाय दिवाळी सुनी-सुनी"
हत्या करून तरुणीचा मृतदेह फासाला लटकला होता, जेणेकरून तरुणीने जीवन संपवलं असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शवविच्छेदनातून खरं प्रकरण उघडकीस आले. याचमुळे महिला आणि मुलींंच्या सुरक्षिततेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे, तसेच ऑनर किलिंगच्या प्रकरणांत दिवसेंदीवस वाढ होऊ लागली आहे,
ADVERTISEMENT












