Crime News : बंगळूरुमधील साई ग्रीन होम अपार्टमेंटमध्ये एक भीषण घटना उघडकीस आली आहे, जिथे श्वेता (वय 24) आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर केनेथ ( वय 25) यांनी पैशांसाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवले. श्वेताने तिची आई मुथ लक्ष्मी यांच्याकडून 50 लाख रुपये कर्ज घेतले होते आणि ते पैसे केनेथवर खर्च केले. जेव्हा तिच्या आईने पैसे परत मागितले, तेव्हा श्वेता आणि केनेथने संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचे हे भीषण पाऊल उचलले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : दिवाळीत 'या' राशींवर पैशाचा होणार वर्षाव
मृतांमध्ये श्वेताचे वडील सोमसुंदर (वय 52), आई मुथुलक्ष्मी (वय 48) आणि धाकटी बहीण सुप्रिया (वय 19) यांचा समावेश होता. या प्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
सहा महिन्यांपासून AI चॅटबोटच्या मदतीने मर्डरचा प्लानिंग
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब अशी की, आरोपी केनेथ हा मागील सहा महिन्यापासून AI चॅटबोटच्या मदतीने मर्डरचा प्लानिंग करत होता. खून केल्यानंतर रक्ताचे डग साफ करण्यासाठी नेमक्या कोणत्या रसायनांची आवश्यकता आहे, मृतदेह कसे पॅक केले जावे. पुरावे नष्ट करण्यासाठी भट्टीतच जाळले जाऊ शकते का? केनेथने फ्लॅटमध्ये भट्टी देखील तयार केली होती.
ADVERTISEMENT












