नागपूर: फटाक्यांवरून वाद, चाकूने सपासप वार करत तरुणाची केली हत्या

योगेश पांडे

• 06:48 PM • 09 Nov 2026

Nagpur crime news : नागपूरमध्ये आनंदाच्या दिवाळी सणावर दुःखाचे विरजण पडले. गाडीसमोर फटाके फोडण्यावरून वाद सुरू झाला होता, त्या वादाचे मारहाणीत रुपांतर झाले आणि मृत्यूने शेवट झाला.

Nagpur crime news

Nagpur crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आनंदाच्या दिवाळी सणावर दुःखाचे विरजण

point

फटाके उडवण्यावरून वाद अन् एकाचा दुर्दैवी अंत

Nagpur Crime News : नागपूरमध्ये आनंदाच्या दिवाळी सणावर दुःखाचे विरजण पडले. गाडीसमोर फटाके फोडण्यावरून वाद सुरू झाला होता, त्या वादाचे मारहाणीत रुपांतर झाले आणि मृत्यूने शेवट झाला. एका 27 वर्षीय तरुणाने चाकूने सपासप वार करत हत्या केली. मृत व्यक्तीची अमन उर्फ बॉबी अशी ओळख समोर आली. या घटनेनं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत, या घटनेनं परिसर हादरून गेला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूर: सुनेनं सासूचं सोनं केलं चोरी अन् विकत घेतला iPhone नंतर..

फटाके उडवण्याच्या वादातून तरुणीवर चाकूने वार 

घडलेल्या घटनेनुसार, रात्री 12.30 वाजता हुडकेश्वर येथील राहिवासी अमन उर्फ बॉबी आपला मित्र अक्षय नौकरकरसोबत देवनगर येथे मित्र प्रसाद राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त चालला होता.याचदरम्यान शहरातील देवनगर चौकात असलेल्या ज्यूस सेंटरच्या समोर काही तरुण फटाके उडवत होते, तेव्हा इतक्यात अमनने काही क्षणांसाठी फटाके काढण्यास सांगितले होते. याच मुद्द्यावरून पुढील काही तरुणांनी अमनसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. बघता बघता वादाला अगदीच हिंसक रुप मिळाले होते. असा आरोप आहे की, मुख्य आरोपी अक्षय मडावी आणि त्याच्या दोन ते तीन साथीदारांनी अमनवर चाकूने हल्ला केला.

तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू 

हल्लेखोरांनी अमनच्या पोटात अनेक वेळा चाकूने सपासप वार करून त्याला गंभीररित्या जखमी केले. त्याला तात्काळ वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. याच घटनेच सर्वाच धक्कादायक प्रकार समोर आला की, मुख्य आरोपी अक्षय मडवीवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरोधात तब्बल 22 गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात सुजल, समीर आणि एका अन्य सथीदार देखील यात समील होता. 

हे ही वाचा : लातूरमध्ये संपत्तीवरून वाद, दुसऱ्या बायकोच्या 7 वर्षीय मुलाची बापानं केली हत्या

या हत्याकांडानंतर पोलीस ठाण्यातही गोंधळ उडाला होता. सांगितले जाते की, तत्काळ कारवाई करत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बजाजनगरचे पोलीस निरीक्षक चेतन चौहान यांची पोलीस मुख्यालयात बदली केली.दरम्यान, बजाजनगर पोलिसांनी अक्षय मडावी आणि त्याच्या साथीदारांविरोधात संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल दाखल करण्यात आला. आरोपाचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.