Crime News : एका नऊ महिन्यांच्या बाळाची संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आहे. बापानेच मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केल्याचा आईने आरोप केला. आईची प्रियंका अशी ओळख समोर आली, तर वडिलांनी अभिषेक अशी ओळख समोर आली. महिलेनं आरोप केला की, लहान मुलाच्या मृत्यूचे कारण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत मृतदेह पुरण्यात आला. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि प्रकरणाचा तापस सुरू केला. हा धक्कादायक प्रकार गाजियाबाद येथील वेव सिटी पोलीस ठाणे परिसरातील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : धाराशिव: 6 जणांचा अंत, अग्निशमन विभागाचा निष्काळजीपणा समोर
नऊ महिन्यांच्या बाळाचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप
या प्रकरणात इंडिया टीव्ही या वृत्तमाध्यमानुसार, एसीपी मसूरी प्रियाश्री पॉल यांच्या माहितीनुसार, बयना गावातील निवासी असलेल्या प्रियंकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सोमवारी पहाटे ती तिच्या सासूसोबत गावाजवळ कामावर गेली होती. तिची नणंद खुशबू आणि तिचा नवरा अभिषेक घरात होते. याचवेळी पती अभिषेकने नऊ महिन्यांच्या बाळाचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप केला.
प्रियंका घरी परतल्यानंतर तिने मुलाबाबत विचारले असता, त्याने बाळ झोपले असल्याची माहिती दिली. तेव्हा तिला बाळ निश्चिल अवस्थेत आढळून आले होते.त्याच्या मानेवर काही व्रण होते. नंतर त्याच बाळाला रुग्णालयात नेले असता, मात्र काही वेळांत त्याचा मृत्यू झाला. तिच्या नवऱ्याने बाळाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर बाळाला पुरण्यात आले होते. यानंतर प्रियंकाने पोलीस ठाण्यात नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली.
नवरा-बायकोचा वाद अन् पतीने मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
तिने बाळालाच्या मानेवरील खुणांचे फोटो आणि व्हिडिओ देखील पोलिसांना दिले.पुढे तिने पोलिसांना सांगितलं की, दिवाळीच्या रात्री तिचा आणि तिच्या पतीत वाद झाला होता.या वादादरम्यान तिच्या पतीने त्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. महिलेनं असा आरोप केला की, तिचा पती हा अंमली पदार्थांचे सेवन करत होता आणि लग्नापासून तिचा छळ सुरू करत होता. त्यांचा विवाहा 2022 मध्ये झाले होते.
हे ही वाचा : नवरा गावी गेला अन् बायको बॉयफ्रेंडसोबत खोलीत...
अशातच एसपी मसुरी प्रियाश्री पाल यांच्या माहितीनुसार, आरोपी अभिषेकला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात आली. मुलाच्या मृत्यूमागील खरे कारण अद्याप समोर आली नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सुरू आहे.
ADVERTISEMENT












