नागपूर : ऐन दिवाळीत शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या, ऑगस्टमध्येच केला होता विवाह

योगेश पांडे

10 Nov 2026 (अपडेटेड: 10 Nov 2026, 10:07 AM)

Nagpur Teacher Couple Suicide Case : नागपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी शिक्षक पती-पत्नी घरात मृतावस्थेत आढळले. ऑगस्ट महिन्यात दोघांनी दुसरा विवाह केला होता. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Nagpur Teacher Couple Suicide Case

Nagpur Teacher Couple Suicide Case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नागपूर : ऐन दिवाळीत शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या

point

ऑगस्टमध्येच केला होता विवाह

Nagpur Teacher Couple Suicide Case : नागपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी एका शिक्षक दाम्पत्याच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. मनीष आणि सोनाली गणवीर अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. रविवारी सकाळी दोघेही त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मनीष आणि सोनाली हे दोघेही पेशाने शिक्षक होते. ते गडचिरोली जिल्ह्यातील एका खासगी शाळेत अध्यापनाचे काम करत होते. यावर्षी ऑगस्ट महिन्यातच दोघांनी विवाह केला होता. विशेष म्हणजे दोघांचाही हा दुसरा विवाह होता. लग्नाला अवघे काही महिने झाले असतानाच दोघांच्या मृत्यूची घटना घडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळावर पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra weather : ऐन दिवाळीत वातावरण बदललं, मंगळवारसाठी IMD ची नवी अपडेट

घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता दोघांचे मृतदेह दिसून आले

दिवाळीच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी मनीष आणि सोनाली हे नागपूरमधील त्यांच्या घरी आले होते. रविवारी सकाळी त्यांचे काही नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी घरी पोहोचले. मात्र, बराच वेळ दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नातेवाईकांना संशय आला. त्यांनी घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता दोघांचे मृतदेह दिसून आले. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरात दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. दिवाळीच्या दिवशीच ही घटना घडल्याने गणवीर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : 'सर्व घडामोडींवर पवार साहेब लक्ष ठेवून, क्षणाक्षणाची अपडेट...', सुप्रिया सुळेंनी थेट व्हिडिओच केला शेअर

पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही

मनीष आणि सोनाली या दोघांनी यावर्षी ऑगस्ट महिन्यात न्यायालयीन पद्धतीने विवाह केला होता. बेलतरोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचाही हा दुसरा विवाह होता. विवाहानंतर ते गडचिरोली जिल्ह्यातील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त ते नागपूरमधील घरी आले होते. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनंतरच दोघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नेमके काय घडत होते आणि आत्महत्येमागे कोणते कारण होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, सध्या तरी या घटनेमागील कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. त्यामुळे पोलीस दोघांच्या वैयक्तिक तसेच कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेत आहेत.

बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. दोघांनी आत्महत्या करण्यामागे नेमके काय कारण होते, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. त्यासाठी त्यांच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबींचीही पडताळणी केली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेशी संबंधित परिस्थिती स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या मनीष आणि सोनाली यांच्या मृत्यूमागील कारण गुलदस्त्यात असून, पोलीस तपासातून नेमकी माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.