Crime News : एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली असून, दहाव्या मजल्यावरून पडून 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणीची ओळख समरीन अशी पटली असून, रविवारी (11 ऑक्टोबर) सायंकाळी 6 वाजता ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, समरीन दुपारी 11:46 वाजता अवनीश नावाच्या तरुणासोबत हॉटेलमधील 1037 क्रमांकाच्या खोलीत आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील ओमेक्स न्यू हजरतगंज संकुलात ही घटना घडली.
ADVERTISEMENT
'अशी' समोर आली घटना
सेलिस्टियल हॉटेलच्या सुरक्षा इंचार्जने रविवारी संध्याकाळी 6:34 वाजता या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, घटनेची गंभीरता लक्षात घेता फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून, त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून वैज्ञानिक पुरावे आणि फोटोग्राफी-व्हिडीओग्राफी केली आहे.
हे ही वाचा : वडिलांचा सरपंच होण्याचा हट्ट, मुलाचा अन् सुनेचा विरोध; शेवटी थरारक हत्याकांड
दुपारी केलं होतं चेक-इन
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, समरीन आणि अवनीश दुपारच्या सुमारास हॉटेलच्या खोलीत दाखल झाले होते आणि संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तरुणी संशयास्पद परिस्थितीत खाली पडली. दहाव्या मजल्यावरून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस खोलीत उपस्थित असलेल्या अवनीशची कसून चौकशी करत असून, घटनेपूर्वी नेमकं काय घडलं याची माहिती गोळा केली जात आहे.
हे ही वाचा : तीर्थयात्रेसाठी कुटुंबासोबत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
हत्या की आत्महत्या?
तरुणीने दहाव्या मजल्यावरून उडी मारली, ती अपघाताची शिकार झाली की यामागे इतर काही कारण आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मृत नातेवाईकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे दक्षिण विभागाचे डीसीपी मोहम्मद मुश्ताक यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांचा तपास आणि पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
ADVERTISEMENT












