Crime News : एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे, जिथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीचा मृतदेह 9 ऑक्टोबर रोजी तिच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसराला सुन्न केले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
500 जणांची कसून चौकशी
घटनेची भीषणता पाहता झारखंड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास मोठ्या गांभीर्याने आणि युद्धपातळीवर हाती घेतला. तब्बल 500 हून अधिक लोकांची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा धागा लागला आणि त्याआधारे त्यांनी एका 35 वर्षीय नराधमाच्या मुसक्या आवळल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला त्याच्याच घरातून सोमवारी रात्री अटक करण्यात आली असून, पीडितेच्या पालकांनी दिलेल्या जबाबांच्या आधारावर पोलिसांनी हे जाळे रचले होते.
हे ही वाचा : राहुल गांधींच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, आंदोलनातील वर्तनावर कोर्टाचे गंभीर सवाल!
'तो' पुरावा ठरला निर्णायक
या गूढ गुन्ह्याची उकल करण्यात एक अत्यंत निर्णायक पुरावा समोर आला, तो म्हणजे आरोपीच्या चेहऱ्यावर असलेले जखमेचे व नखांचे व्रण. मृत मुलीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या शेवटच्या संघर्षात आरोपीच्या चेहऱ्यावर हे निशाण उमटले होते, ज्याला पोलिसांनी तपासाचा मुख्य सुगावा मानले. एवढेच नव्हे तर, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपीने परिधान केलेली टी-शर्ट आणि एक रक्ताने माखलेला तौलिया देखील पोलिसांनी जप्त केला असून हे पुरावे या खटल्यात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
हे ही वाचा : हॉटेलच्या रुममध्ये मित्रासोबत सहा तास राहिली तरुणी, नंतर दहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू; नेमकं कारण काय?
चौकशी दरम्यान काय घडलं?
पोलिसांच्या चौकशीदरम्यान अखेर या नराधमाने आपला गुन्हा कबूल केला असून सध्या या प्रकरणात कायदेशीर कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या भीषण घटनेमुळे दुमका जिल्ह्यात दहशतीचे आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाशी संबंधित इतर सर्व बाजूंचीही सखोल चौकशी करत आहेत जेणेकरून दोषीला कठोर शिक्षा होईल.
ADVERTISEMENT












