नागपूर: फार्महाऊसवर अश्लील डान्स, चार नर्तिका आणि 22 पुरूषांवर कारवाई

योगेश पांडे

16 Oct 2026 (अपडेटेड: 16 Oct 2026, 03:35 PM)

Nagpur crime : नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस तहसील परिसरातील चांपा क्षेत्रातील ग्रीन फार्म येथे अश्लील नृत्य सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 महिला आणि 22 पुरुषांसहित एकूण 26 आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Nagpur crime (AI Photo)

Nagpur crime (AI Photo)

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नागपुरच्या फार्महाऊसवर अश्लील नृत्य सुरू असल्याचा प्रकार उघडकीस

point

 संबंधितांवर हॉटेल कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Nagpur Crime : नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस तहसील परिसरातील चांपा क्षेत्रातील ग्रीन फार्म येथे अश्लील नृत्य सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 महिला आणि 22 पुरुषांसहित एकूण 26 आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही कारवाई फार्महाऊस संबंधित असल्याचा संशय आहे. याच फार्महाऊसशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर करण्यात आली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबईत 12 वर्षीय मुलीने 2 वर्षाच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं..

फार्महाउसवर महिलांचे अश्लील नृत्य

या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांना घटनबाबत एक गुप्त सूचना मिळाली असता, ग्रीन फार्म नावाच्या एका फार्म हाऊसमध्ये 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी अश्लील नाचकाम सुरू होते. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत फार्महाऊसच्या सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेत कारवाई केली. पोलिसांनुसार, महिला या अश्लील नृत्य करत होत्या अशी त्यांनी माहिती दिली. 

22 हून अधिक पुरुषांचा समावेश 

अशातच पोलिसांकडून ज्या आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली, त्यात फार्महाऊसचे मालक रामलू कोंड्या सुलतान, मॅनेजर अनवर खान, केयरटेकर आरिफ सुलेमान शेखसह इतर 22 पुरुषांचा समावेश होता. या प्रकरणात आरोपीच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

 संबंधितांवर हॉटेल कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणात गडचिरोली, बालाघाट, अकोला, भद्रावती, वर्धा, नागपूर, कामठी, गोंदिया आणि चंद्रपूर येथील व्यक्तींचाही समावेश आहे. तसेच, चार महिला आरोपी असल्याचे वृत्त आहे. संबंधितांवर हॉटेल कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. 

हे ही वाचा : Astrology : नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस 'या' राशींवर देवीची कृपा

हॉटेल, रेस्टॉरंट आणि परमिट रूममध्ये अश्लील नृत्यांवर बंदी घालणाऱ्या आणि अशा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र कायद्यांतर्गत पोलीस गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली.