Crime News : उत्तर प्रदेशातील बांदा येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मामासोबत भाच्याने दारू प्यायली होती, नंतर तो मामीसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणाला लाठी काठीने बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. महिलेचं आणि तरुणाचे एकमेकांसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही दुर्दैवी घटना घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नागपूर: फार्महाऊसवर अश्लील डान्स, चार नर्तिका आणि 22 पुरूषांवर कारवाई
पतीनं तरुणाला पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले
संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, महिलेच्या नवऱ्याने तरुणाला आपल्या पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते, नंतर मामाने तरुणावर हल्ला केला. दरम्यान, प्रकरणात महिलेनं लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. या घटनेत पार्श्वभूमी समजून घेतली आणि त्याच रात्री अशी घटना घडली होती, याचा आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हा गुजरात येथे मजुरीचे काम करत होता. उत्सवामुळे तो दोन दिवसांपूर्वीच गावी आला होता. त्यानंतर तो आपल्या मामाकडे पोहोचला होता. दोघांनी दारू प्यायली होती. काही वेळानंतर मामा हा घराच्या छतावर झोपण्यास गेला होता. थोड्याच वेळांत त्याला जाग आली असता, त्याने भाच्याला आपल्या पत्नीसोबत आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिले.
लाठी काठीने तरुणावर हल्ला अन् मृत्यू
यानंतर दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. रागात त्याने लाठी काठीने तरुणावर अनेकदा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपीने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने मृतदेह घराच्या दराजवळ फेंकून दिला होता. जेव्हा कुटुंबियांनी मृतदेह पाहिला असता, घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
हे ही वाचा : नांदेड: माहूर गडावर अपघात, 100 फूट खोल दरीत टेम्पो उलटून तिघांचा अंत
नंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशातच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. संबंधित प्रकरणात पुढील चौकशी केली जाणार आहे. या तक्रारीत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT












