विवाहित प्रेयसीच्या नादात आयुष्य केलं बरबाद, वडिलांची दगडाने ठेचून हत्या अन्...

मुंबई तक

• 02:45 PM • 15 Oct 2026

एका तरुणाने विवाहित प्रेयसीच्या नादाला लागून आपल्या वडिलांची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वीस दिवसांच्या तपासानंतर त्याला अटक केली आहे. गया परिसरातील ही घटना आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विवाहित प्रेयसीच्या नादात आयुष्य केलं बरबाद

point

वडिलांची दगडाने ठेचून हत्या अन्...

Crime News : एका वडिलांची त्यांच्याच मुलाने अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानेच डायलिसिससाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने वडिलांना नेऊन त्यांची दगडाने डोके ठेचून हत्या केली. चंदन असे या आरोपी मुलाचे नाव असून, तो बऱ्याच काळापासून आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका विवाहित महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता. बिहारच्या गयाजी जिल्ह्यात हा प्रकार घडला.

हे वाचलं का?

विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध

मृत कृष्णा गुप्ता यांचा मुलगा चंदन याचे गल्लीतील एका विवाहित महिलेसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. ती महिला चंदनकडून वारंवार पैसे उकळत असे आणि त्याची जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती. कृष्णा गुप्ता या अनैतिक संबंधांना आणि जमिनीच्या व्यवहाराला कडाडून विरोध करत होते, त्यामुळेच वडिलांचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला.

हे ही वाचा : पूर्णेकर हत्या : 'हो.. मी मारेकऱ्यांना ओळखतो...', शिवसेना नगरसेविका मिनाक्षी शिंदेंच्या पतीचा खळबळजनक जबाब

आठ वर्षांपूर्वी प्रेयसीच्या नावाचा टॅटू

या आधीही चंदनने प्रेयसीच्या सांगण्यावरून विष प्राशन केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, त्याने आपल्या हातावर आठ वर्षांपूर्वीच या प्रेमिकेचे नाव गोंदवून घेतले होते. तिच्याच सांगण्यावरून चंदनने वडिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 2021 मध्ये चंदनच्या मोठ्या भावाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता, त्यानंतर हा तरुण आपल्या आई-वडिलांचा एकमेव आधार मानला जात होता.

हे ही वाचा : हॉटेलच्या रुममध्ये मित्रासोबत सहा तास राहिली तरुणी, नंतर दहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू; नेमकं कारण काय?

'अशी' केली हत्या

24 सप्टेंबर रोजी चंदन आपल्या वडिलांना डायलिसिससाठी हॉस्पिटलमध्ये नेतो असे सांगून घरून बाहेर पडला होता, मात्र दोघेही घरी परतले नाहीत. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी एका डोंगरावर कृष्णा गुप्ता यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि कसून तपासाच्या आधारे सुमारे वीस दिवसानंतर आरोपी चंदनला बेड्या ठोकल्या असून, त्याच्या प्रेयसीच्या या गुन्ह्यातील भूमिकेबद्दल कसून चौकशी केली जात आहे.