वडिलांचा सरपंच होण्याचा हट्ट, मुलाचा अन् सुनेचा विरोध; शेवटी थरारक हत्याकांड

मुंबई तक

• 11:57 AM • 15 Oct 2026

एका 60 वर्षीय व्यक्तीला सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती. मात्र त्याच्या या निर्णयाला मुलाचा आणि सुनेचा विरोध होता. यातूनच जयपूरमध्ये एक भयानक घटना घडली.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वडिलांचा सरपंच होण्याचा हट्ट

point

मुलाचा अन् सुनेचा विरोध

point

शेवटी थरारक हत्याकांड

Crime News : पंचायतीच्या आगामी निवडणुकीत सरपंच पदाची निवडणूक लढवण्याच्या हट्टापोटी एक भयानक घटना घडलीये. एका 60 वर्षीय वडिलांनी स्वतःच्या पोटच्या मुलाला आणि सुनेला एसयूव्ही (बोलेरो) गाडीखाली चिरडून ठार केल्याची थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मंगळवारी (13 ऑक्टोबर) रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी आरोपी रामचंद जाट याला तातडीने ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील चांगोई गावातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

विवादाचे नेमके कारण

आरोपी रामचंद्र गावात वजन काटा (वेजब्रिज) चालवतो आणि त्याला चांगोई गावातून सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती. मात्र, त्यांचा 40 वर्षीय मुलगा रवींद्र आणि 35 वर्षीय सून महिंद्र यांचा या निर्णयाला तीव्र विरोध होता. या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वारंवार वाद आणि खटके उडत होते. मंगळवारी रात्रीही त्यांच्यात याच विषयावरून जोरदार खडाजंगी झाली, जी नंतर विकोपाला गेली.

हे ही वाचा : उल्हासनगर : RTI कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, 4 वर्षांपूर्वीचं वैर..नेमकं काय घडलं?

क्रूर हत्या

मंगळवारी रात्री वाद झाल्यानंतर रामचंद्र आणि रवींद्र गावातील वेजब्रिजवर गेले, तर काही वेळानंतर महिंद्रसुद्धा तिथे पोहोचली. तिथेही निवडणुकीवरून वाद सुरूच राहिला. दरम्यान, रवींद्र आणि महिंद्र हे दोघे पती-पत्नी घरी परतत असताना, पाठीमागून आलेल्या संतापलेल्या रामचंद्राने आपल्या बोलेरो जीपने त्यांना जोरदार धडक दिली आणि अंगावर गाडी घालून दोघांनाही जागीच चिरडले. स्थानिकांनी आरडाओरडा ऐकून धाव घेतली आणि पोलिसांना याची माहिती दिली.

हे ही वाचा : तीर्थयात्रेसाठी कुटुंबासोबत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

हळहळ आणि पुढील प्रक्रिया

पोलिसांनी तातडीने दोन्ही जखमींना तातारनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या भीषण घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृत पती-पत्नी मागे त्यांची 11 वर्षांची एकुलती एक मुलगी उरली आहे. दरम्यान, चांगोई येथे 16 नोव्हेंबर रोजी सरपंच पदासाठी  मतदान होणार असून, याच निवडणुकीच्या राजकीय महत्त्वाकांक्षा या हत्याकांडात बळी ठरल्या आहेत.