उल्हासनगर : RTI कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, 4 वर्षांपूर्वीचं वैर..नेमकं काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

15 Oct 2026 (अपडेटेड: 15 Oct 2026, 10:18 AM)

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरच्या लालचक्की रोडवर हरेश गजवानी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी दोन तासांत तीन आरोपींना अटक केली असून, जुन्या वैरातून हत्या झाल्याचा संशय आहे.

Ulhasnagar Crime News

Ulhasnagar Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगर : RTI कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

point

4 वर्षांपूर्वीचं वैर..नेमकं काय घडलं?

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये बुधवारी रात्री एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील लालचक्की रोडवर रात्री सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षा स्थानकाजवळ झालेल्या या गोळीबारात हरेश गजवानी उर्फ शहाणी याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. गोळीबाराची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हरेश गजवानी याच्या डोक्यात दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला.

हे वाचलं का?

हेही वाचा : कोंचिग क्लासवरून परतताना विद्यार्थीनीचा रस्ता अडवला, दोघांनी केली छेडछाड

पोलिसांकडून तिघांचीही चौकशी सुरू 

या हत्येच्या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे दोन तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली. अविनाश नायडू, नूर आलम खान आणि विजय पुराणसिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून तिघांचीही चौकशी सुरू आहे. अविनाश नायडू याने हरेश गजवानी याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. मात्र, या घटनेत प्रत्येक संशयिताची नेमकी भूमिका काय होती, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि हत्येशी संबंधित इतर बाबींचाही पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा : Maharashtra Weather : कुठे वारा, तर कुठे उष्णतेची लाट; IMD चा अंदाज

 हत्येमागे चार वर्षांपूर्वीचै वैर असण्याची शक्यता

उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे चार वर्षांपूर्वीचै वैर असण्याची शक्यता आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी अविनाश नायडू याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या प्रकरणात हरेश गजवानी याचे नाव समोर आले होते. त्यामुळे सध्याच्या हत्येचा आणि चार वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. जुन्या वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हरेश गजवानी हा आयटीआय कार्यकर्ता होता

हरेश गजवानी आणि अविनाश नायडू या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. हरेश गजवानी हा आयटीआय कार्यकर्ता होता. डान्स बार, मटका, गुटखा विक्री, रमी क्लब आणि लॉटरी यांसारख्या व्यवसायांविरोधात तो तक्रारी करत असे. चार वर्षांपूर्वी अविनाश नायडू याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात हरेश गजवानी याचे नाव समोर आले होते. आता त्याच हरेश गजवानीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने जुन्या वादाचा या घटनेशी संबंध आहे का, हा तपासाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि या घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.