Crime News : उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपला पती शिवम गुप्ता याच्यावर अत्यंत धक्कादायक आरोप केला आहे. महिलेच्या सांगण्यानुसार, तिचा नवरा पैसे देऊन फ्लॅटवर मुले घेऊन येतो आणि त्या मुलांसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. महिलेने जेव्हा फ्लॅटच्या खोलीत गुप्त (हिडन) कॅमेरा लावला, तेव्हा तिला पतीच्या या कृत्यांचा उलगडा झाला. सध्या हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
लग्नानंतर पतीकडून पत्नीचा छळ
पीडितेचा विवाह 2024 मध्ये एटा येथील रहिवासी शिवम गुप्ता याच्याशी झाला होता. शिवम एका खासगी कंपनीत कामाला असून त्याला अडीच लाख रुपये पगार आहे. पीडितेच्या वडिलांनी आपल्या ऐपतीपेक्षा जास्त हुंडा दिला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच शिवम आणि त्याच्या कुटुंबीयांनी 50 लाख रुपये रोख रकमेची अतिरिक्त मागणी सुरू केली. आरोप आहे की, ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे सोनालीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जाऊ लागला.
हे ही वाचा : 'शांती, विश्वास, एकाकी प्रेम..' रुममध्ये नग्नावस्थेत सापडला मृतदेह, मृत्यूआधी पूजानं भिंतीवर काय लिहिलं?
हिडन कॅमेऱ्यामुळे पतीचे काळे कृत्य उघड
पतीचे विचित्र वागणे आणि संशयास्पद हालचालींमुळे सोनालीला त्याच्यावर संशय आला. त्यामुळे सत्य शोधण्यासाठी तिने आग्रा येथील आपल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गुपचूप कॅमेरे लावले. कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग तपासले असता, शिवम कथितरीत्या भाड्याने आणलेल्या मुलांसोबत अनैसर्गिक कृत्ये करत असल्याचे दिसून आले. जेव्हा पत्नीने या आक्षेपार्ह कृत्यांना विरोध केला आणि कुटुंबीयांना सांगण्याचे धाडस दाखवले, तेव्हा पतीने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प राहण्यासाठी दबाव टाकला.
हे ही वाचा : गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला पाठवले तिचे शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ, बायकोचे 'ते' Video पाहून नवऱ्याने...
पोलिसांचा तक्रार नोदंवण्यास नकार
पीडितेचा आरोप आहे की, सुरुवातीला सदर कोतवाली पोलिसांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही आणि तक्रार नोंदवण्यास नकार दिला. अखेर पीडितेने जिल्ह्याच्या उच्च अधिकाऱ्यांकडे न्यायाची हाक दिली. अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. पीडितेने संरक्षणाची मागणी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
ADVERTISEMENT











