गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला पाठवले तिचे शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ, बायकोचे 'ते' Video पाहून नवऱ्याने...

मुंबई तक

Crime News : विवाहाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करण्यात आले. एवढंच नाही,तर पीडितेला पतीपासून विभक्त व्हावे लागले. ज्यात, संबंधित प्रकरणात नराधमाने प्रेमाचे खोटे नाटक करत तिच्याशी शरीरसंबंध ठेवले कुटुंबियांनी तरुणीचे दुसरीकडे लग्न जुळल्यावर, तिला ब्लॅकमेल करून तिचे शोषण केले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

आरोपीचे तरुणीशी शरीरसंबंध 

point

पीडितेच्या नवऱ्याला पाठवले अश्लील व्हिडिओ

Crime News : विवाहाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करण्यात आले. तरुणीशी प्रेमाचे खोटे नाटक दाखवून नराधमाने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. नंतर कुटुंबीयांनी पीडितेचे दुसरीकडे लग्न जुळल्यावर, तिला ब्लॅकमेल करत तिचे शोषण केले. तरुणीने नकार दिल्यास आरोपी नराधमाने तरुणीच्या नवऱ्याला अश्लील फोटो-व्हिडिओ पाठवून तिचा संसार सुरु होण्याआधीच मोडण्यास भाग पाडला. त्याने पुन्हा तिच्याशी शरीरसंबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार दिला. पीडितेनं पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला, अशातच आरोपीची ओळख मुश्फिक हुसैन अशी झाली असून पोलिसांनी त्याला अटक केली. 

हे ही वाचा : Emergency Alert: तुमच्याही फोनमध्ये अचानक वाजू लागला सायरन? लोकं घाबरून पाहू लागले एकमेकांकडे!

आरोपीचे तरुणीशी शरीरसंबंध 

दरम्यान, 26 वर्षीय पीडित महिलेने महिला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तरुणीची मुश्फिक हुसैनशी 2025 मध्ये मैत्री झाली होती, मुश्फीकने तरुणीशी प्रेम व्यक्त केले, नंतर तिला अनैतिक शारीरिक संबंधांसाठी प्रलोभन दिले आणि तिचे शोषण केले. दरम्यान, तिच्या कुटुंबियांनी पीडितेचं दुसऱ्याच मुलाशी लग्न जुळवलं. विवाहानंतर आरोपी मुश्फिक तिला भेटायला बोलावू लागला होता. 

पीडितेच्या नवऱ्याला पाठवले अश्लील व्हिडिओ

तो एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेच्या पतीला अश्लील व्हिडिओ-फोटो पाठवण्याची धमकी देऊ लागला, नंतर शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली आणि तिचे शोषण करून तिला ब्लॅकमेल केले. महिलेनं त्याच्या या कृत्याचा विरोध दर्शवला असता, आरोपीने तिच्या पतीला लग्नापूर्वी दोघांच्या नातेसंबंधाबाबत सांगितलं. तो एवढ्यावर न थांबता मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवले होते. 

लग्नाचे वचन आणि पुन्हा लैंगिक शोषण 

पतीने तिला सोडून दिले आणि ती तिच्या माहेरी राहू लागली होती. पतीने तिला सोडल्यानंतर, आरोपी मुश्फिक पुन्हा त्या मुलीच्या जवळ येऊ लागला आणि तिला लग्नाचे वचन दिले. नंतर पीडितेनं त्याच्यावर लग्नासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने नकार दिला. नंतर त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.  

हे वाचलं का?