फुटपाथवरुन 10 वर्षीय मुलीचं अपहरण, बलात्कार करुन हत्या; पोलिसांनी आरोपीवर झाडली गोळी

Delhi Crime News : दिल्लीच्या महरौलीत फुटपाथवर झोपलेल्या 10 वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार आणि नंतर हत्या. आरोपी ड्रायव्हरला 4 तासांत अटक, पळून जाताना पोलिसांनी झाडल्या गोळ्या

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:22 AM • 25 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

फुटपाथवरुन 10 वर्षीय मुलीचं अपहरण

point

बलात्कार करुन हत्या; पोलिसांनी आरोपीवर झाडली गोळी

Delhi Crime News : फुटपाथवर आपल्या कुटुंबासह झोपलेल्या 10 वर्षीय मुलीला एका ड्रायव्हरने नशेत असताना जबरदस्तीने उचलून नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केली. दरम्यान, काही तासांतच पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपीला अटक केली. अटकेनंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांच्या चकमकीत त्याच्या पायाला गोळी लागली. चौकशीदरम्यान आरोपीने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबई : लोकलमध्ये किरकोळ वाद, तरण्याबांड मुलाचा खून, आईने हंबरडा फोडला

आरोपी मुलीला घेऊन पसार झाला,  अन् पुढे काय घडलं? 

सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेत पीडित मुलगी तिचे आई-वडील, दोन बहिणी आणि एका भावासह महरौली परिसरातील सीडीआर चौकाजवळील फुटपाथवर झोपली होती. हे कुटुंब तेथेच फुटपाथवर राहते. त्याच वेळी बबलू नावाचा ड्रायव्हर तिथे आला. तो नशेत होता आणि एखादे भाडे मिळावे या प्रतीक्षेत होता. फुटपाथवर झोपलेल्या मुलीला पाहून त्याने तिला जबरदस्तीने उचलले आणि गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुलीची झोपमोड झाली आणि ती आरडाओरडा करू लागली. आवाज ऐकून तिचे वडील गाडीमागे धावले, मात्र तोपर्यंत आरोपी मुलीला घेऊन पसार झाला होता. वडिलांनी तात्काळ पीसीआरला कॉल करून पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा : लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, नवरी मुलीसह आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, अश्लील फोटो अन्..

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची पटली ओळख 

कॉल मिळताच महरौली पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजमध्ये आरोपी मुलीला उचलून नेत असल्याचे स्पष्ट दिसत होते, मात्र गाडीची केवळ सावली दिसत होती, नंबर स्पष्ट नव्हता. अधिक तपासात समजले की ती गाडी तिथे सुमारे एक तास उभी होती. पहाटे चारच्या सुमारास गाडी तिथे आली होती आणि पाचच्या सुमारास मुलीला उचलण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी रॅपिडो, ओला आणि उबर कंपन्यांकडून त्या भागाची माहिती मागवली. पुढे-मागे असलेल्या रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यातून गाडीची ओळख पटली आणि ती कोण चालवत होता हेही समजले.

गाडीच्या जीपीएस लोकेशन आणि आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला. आरोपी विकासपुरी भागात सापडला आणि तेथूनच त्याला अटक करण्यात आली. अपहरणाच्या घटनेनंतर अवघ्या चार तासांत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सुरुवातीला चौकशीत आरोपीने मुलीबद्दल काहीही माहित नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी कडकपणे विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की अपहरणानंतर तो मुलीला सुमारे 20 किलोमीटर दूर गुरुग्राम-फरीदाबाद रोडवर घेऊन गेला. वाटेत त्याने मुलीला गाडीत बांधून ठेवले होते. नंतर एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवून त्याने मुलीला जवळच्या जंगलात नेले. तिथे त्याने मुलीवर बलात्कार केला आणि गमछ्याने गळा आवळून तिची हत्या केली. मृतदेह तिथेच टाकून तो निघून गेला. 

आरोपीवर बिहारमध्ये आधीच मारहाणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी व मुले बिहारमध्ये राहतात. मंगळवारी संध्याकाळी पोलिस आरोपीला घटनास्थळी नेत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत त्याच्या पायाला गोळी लागली. या प्रकरणानंतर पोलिस आता ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांना नोटीस देणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा ड्रायव्हर टॅक्सी कसा चालवत होता, याचा तपास केला जाणार आहे.