मुंबई : लोकलमध्ये किरकोळ वाद, तरण्याबांड मुलाचा खून, आईने हंबरडा फोडला

मुंबई तक

Mumbai Local Murder : अंधेरी-बोरिवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात 22 वर्षीय युवकाचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला. आरोपी बोरीवली स्थानकावर ट्रेन पूर्ण थांबण्यापूर्वी उतरून फरार झाला असून जीआरपीकडून तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Local Murder case
Mumbai Local Murder case
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : लोकलमध्ये किरकोळ वाद

point

तरण्याबांड मुलाचा खून, आईने हंबरडा फोडला

Mumbai Local Murder : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये सोमवारी (दि.23) उशिरा रात्री घडलेल्या एका वादाने हिंसक रूप घेतले आणि त्यात 22 वर्षीय युवकाचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला. लोकल ट्रेन अंधेरी आणि बोरीवली स्थानकांदरम्यान धावत असताना ही घटना घडली. मृत युवकाची ओळख मयंक लोहार अशी झाली आहे. घटनेनंतर आरोपी बोरीवली स्थानकावर ट्रेन पूर्ण थांबण्यापूर्वीच उतरून फरार झाला. दरम्यान, तरण्याबांड मुलाला गमावल्याने मयंक आईने हंबरडा फोडलाय. त्याच्या आईला स्वत:ला सावरणेही कठीण झाले आहे. 

लोकलच्या फर्स्ट क्लास कोचमध्ये तरुणाचा मर्डर 

प्राथमिक माहितीनुसार, मयंक लोहार आणि आरोपी दोघेही अंधेरी स्थानकावरून लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात चढले होते. त्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता. डब्याचा दरवाजा बंद करण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही क्षणांतच परिस्थिती चिघळली आणि दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान आरोपीने मयंकच्या पोटात चाकू खुपसल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेला मयंक डब्यातच कोसळला.

हेही वाचा : कुटुंबियांचा विरोध झुगारुन प्रेमविवाह, 7 महिन्यांच्या बाळाला घेऊन गावात आले, अन् गेम झाला!

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू 

रात्री 11.04 वाजता लोकल बोरीवली स्थानकात पोहोचताच रेल्वे सुरक्षा दल, सरकारी रेल्वे पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री 11.07 वाजता सुरक्षा कर्मचारी संबंधित डब्यात पोहोचले आणि स्ट्रेचर तसेच वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली. रात्री 11.12 वाजता जखमी युवकाला डब्यातून बाहेर काढून आपत्कालीन उपचारासाठी नेण्यात आले. मात्र रात्री 11.22 वाजता आपत्कालीन वैद्यकीय कक्षातील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्यानंतर रात्री 11.42 वाजता मृतदेह रुग्णवाहिकेतून कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला.

हे वाचलं का?