सिनेमाला लाजवेल असा कट रचला, बॉयफ्रेंडकडे सारखा 'तो' हट्ट करणे जीवावर बेतले!

odisha crime news : लग्नासाठी दबाव टाकत असल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ओडिशातील गंजाम जिल्ह्यात समोर आला आहे. अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न पोलिस तपासात उघड झाला.

odisha crime news

odisha crime news

मुंबई तक

• 07:33 AM • 25 Jun 2026

follow google news

odisha crime news : लग्नासाठी वारंवार आग्रह धरणाऱ्या प्रेयसीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याचं समोर आलंय.. मृत तरुणीची ओळख अंबिका अशी झाली असून या प्रकरणातील आरोपी राकेश आचार्य याला अटक करण्यात आली आहे. दिगापहांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमाखंडी पेंथ परिसरात राहणाऱ्या राकेशला अटक करून स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. सुरुवातीला ही घटना रस्ते अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिस तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांमुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, नवरी मुलीसह आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, अश्लील फोटो अन्..

राकेश आणि अंबिका यांच्यात दीर्घकाळापासून प्रेमसंबंध

पोलिसांच्या माहितीनुसार, राकेश आणि अंबिका यांच्यात दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. मात्र अंबिका सतत लग्नाचा आग्रह धरत असल्याने दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तपास अधिकाऱ्यांचा संशय आहे की लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची इच्छा नसल्यामुळे राकेशने अंबिकाला संपवण्याचा कट रचला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी राकेश अंबिकाला मोटारसायकलवरून गोपालपूर येथे घेऊन गेला होता. दोघांनी दिवसभर एकत्र वेळ घालवला आणि रात्री उशिरा परतीचा प्रवास सुरू केला. याच प्रवासादरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा : मुंबई : लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या, दरवाजा बंद करण्यावरुन वाद अन् भयानक घडलं!

उड्डाणपुलाजवळ राकेशने मोटारसायकल थांबवली अन् पुढे काय घडलं? 

तपासादरम्यान पोलिसांना असे आढळले की परतीच्या मार्गावर अंकुली उड्डाणपुलाजवळ राकेशने मोटारसायकल थांबवली आणि अंबिकाला खाली ढकलल्याचा आरोप आहे. उड्डाणपुलावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या मते, ही घटना पूर्वनियोजित होती आणि अपघातासारखी दिसावी यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले होते. घटनेनंतर राकेशने अंबिकाचा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्याने स्वतः अंबिकाच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची माहिती दिली होती. मात्र त्याच्या कथनातील विसंगती आणि घटनास्थितीतील फरक लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना संशय आला.

अंबिकाचे काका काह्नु जेना यांनी बैद्यनाथपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सखोल तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले तसेच घटनास्थळावरील पुरावे तपासले. तपासादरम्यान मृत्यू हा साधा अपघात नसल्याचे दर्शवणारे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर राकेशविरोधात महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. गंजाम जिल्ह्यातील रोही गावातील अंबिका ही अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. तिने बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले होते आणि डॉक्टर होण्याच्या उद्देशाने ती ब्रह्मपूर येथे राहून नीट परीक्षेची तयारी करत होती. तिच्या उज्ज्वल वैद्यकीय कारकिर्दीची स्वप्ने पाहणाऱ्या कुटुंबीयांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओडिशातील गंजाम जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.