Navi Mumbai Crime : नवी मुंबईत नऊ वर्षांच्या शाळकरी मुलीची हत्या केल्याची दुर्दैवी घटना आहे. शनिवारी दुपारी ती खेळण्यास घरातून बाहेर गेली होती, मात्र ती परतली नाही. कुटुंबाच्या तक्रारीनुसार, तुर्भे पोलिसांनी मुलगी पोलीस ठाण्यात हकवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. मंगळवारी सकाळी पावणे एमआयडीसी परिसरातील बावखलेश्वर मंदिराजवळ जंगलात मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचाराच्या खुणा होत्या.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : घरात शिरून महिलेचा फाडला ब्लाउज, नंतर अमानुष मारहाण
मृत मुलगी ही नवी मुंबई महापालिकेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होती. ती तुर्भे येथील इंदिरानगर भागातील एका चाळीत तिच्या आई-वडिलांसोबत आणि तीन मोठ्या बहिणींसोबत राहत होती. तिचे वडील गवंडीकाम करत होते, तर तिची आई तुर्भे एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होती. ती चार बहिणींमध्ये सर्वात लहान होती.
जेवणासाठी मुलगी घराबाहेर गेली
शनिवारी शाळेतून घरी परतल्यानंतर, तिने दुपारी साडेतीनच्या सुमारास जेवण केले आणि परिसरात खेळायला बाहेर गेली होती. जेव्हा या घटनेनंतर आई सायंकाळी सातच्या सुमारास कामावरून परतली असता, तिचा नवरा आणि तीन मुली घरी होत्या. जेव्हा आईने तिच्या लहान मुलीबाबत विचारले असता, तिच्या 16 वर्षाच्या बहिणीने तिला सांगितलं की, ती जेवणानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास खेळण्यास बाहेर गेली होती.
संध्याकाळपर्यंत मुलगी न परतल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेण्यात आला होता. त्यांनी तुर्भे एमआयडीसी परिसरात शोध घेतला, मात्र ती आढळली नाही. रविवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तुर्भे पोलिसांनी मुलीचा शोध घेम्यासाठी एक विशेष पथक तयार केले होते.
हे ही वाचा : सौरव दास आणि आशुतोष रांकाला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याची दिली कबुली
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेला आरोपी हा त्याच परिसरात राहत होता आणि मजुरीवर काम करून आपले पोट भागवत होता. चौकशीदरम्यान, त्याने मुलीला अन्न आणि प्येयाचे आमिष दाखवून बोलावले असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला गळा दाबून संपवण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह बावखलेश्वर मंदिराच्या जवळील जंगलात फेकून दिला होता. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या हत्येशी संबंधित कलमांतर्गत पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT












