Crime News : बेंगलोरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 43 वर्षीय मेकअप आर्टिस्ट महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी हनियुर चंद्रगौडा (46) याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी चंद्रगौडा हा रामनगर येथील बाल कल्याण समितीचा (CWC) सदस्य आहे. त्याने स्वतःची खोटी ओळख सांगून महिलेची फसवणूक केली आहे.
ADVERTISEMENT
ओळख आणि फसवणुकीची सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गेल्या आठ वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत आहे. 2021 मध्ये तिची ओळख चंद्रगौडाशी झाली. त्याने आपण टीव्ही सीरियल्सशी संबंधित असल्याचे सांगून, कामाचे आमिष दाखवून तिचा नंबर मिळवला. स्वतःला लेक्चरर असल्याचे भासवून आणि आपल्याला चांगला पगार आहे असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
हे ही वाचा : पुण्यात शिकायला आलेल्या संगमेश्वरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी युसूफ सय्यदला अटक
ब्लॅकमेलिंग आणि पैशांची लूट
आरोपीने केवळ शारीरिक शोषणच केले नाही, तर पीडितेचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. 'जर माझं ऐकलं नाहीस, तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन,' अशी धमकी देत तो तिला सतत धमकावत राहिला. याच भीतीपोटी महिलेला त्याचे अत्याचार सहन करावे लागले. तपासात असेही समोर आले आहे की, 2021 पासून आतापर्यंत आरोपीने पीडितेकडून तब्बल 5 लाख रुपये उकळले आहेत, जे त्याने अद्याप परत केले नाहीत.
हे ही वाचा : ‘महायुतीच्या पंगतीत बसलात तर वाढलेले पदार्थ खावेच लागतील', शिंदेंचे शिलेदार झालेल्या बच्चू कडूंना कोणी सुनावलं?
खोट्या कागदपत्रांचा आधार
आरोपी चंद्रगौडाची फसवणूक इथेच थांबली नाही. 2024 मध्ये त्याने महिलेच्या कागदपत्रांचा वापर करून एक घर भाड्याने घेतले आणि तिथे स्वतःला तिचा पती म्हणून घोषित केले. इतकेच नाही तर, त्याने महिलेच्या मुलीच्या शाळेतील कागदपत्रांमध्ये स्वतःचे नाव वडील म्हणून लावून घेतले. तसेच, रस्त्यावरील टोल वाचवण्यासाठी त्याने 'एसपी' (SP) पदाचे बनावट ओळखपत्रही तयार केले होते.
हे ही वाचा : Personal Finance: या Scheme ची अख्ख्या मार्केटमध्ये चर्चा, मिळणार पैसाच पैसा!
पोलिसांची कारवाई
पीडित महिलेने 30 एप्रिल रोजी राजराजेश्वरी नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 (फसवणूक करून लैंगिक संबंध ठेवणे) आणि कलम 204 (लोकसेवकाची खोटी ओळख सांगणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीनेच अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्य केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT











