'बायकोचे तीन पुरुषांशी संबंध आहेत..' सॉफ्टवेअर इंजिनिअरने संपवले आयुष्य, 19 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचा आरोप केल्यानंतर एका 36 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने तलावात उडी मारुन आपले जीवन संपवले आहे. त्याने 19 पानांची एक सुसाईड नोट मागे ठेवली होती, ज्यात त्याने आपल्या बायकोचे तीन पुरुषांशी संबंध असल्याचा दावा केला होता.

Software Engineer Suicide

Software Engineer Suicide

मुंबई तक

• 12:38 PM • 01 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायकोचे तीन पुरुषांशी संबंध आहेत..

point

सॉफ्टवेअर इंजिनिअरने संपवले आयुष्य

point

19 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

Software Engineer Suicide : हैदराबादमध्ये एका 36 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने हुसेन सागर तलावात उडी मारून आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीताराम असे मृत व्यक्तीचे नाव असून, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने 19 पानांची एक विस्तृत सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या पत्रात त्याने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले असून, तिच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. सीतारामच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

सुसाईड नोटमध्ये काय?

सीतारामने सुसाईड नोटमध्ये आपल्या पत्नीवर, रेणुकावर, गेल्या दीड वर्षात तीन वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्याने लिहिले आहे की, यातील एका व्यक्तीने रेणुकासोबतचे खाजगी क्षण रेकॉर्ड केले होते आणि रमणा नावाच्या एका इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन ते व्हिडिओ व्हायरल केले. विशेष म्हणजे, आपल्या पत्नीचे असे व्हिडिओ ऑनलाइन पाहिल्यानंतरच आपल्याला या प्रकरणाची माहिती मिळाली, ज्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक धक्का बसला, असे सीतारामने पत्रात स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : धाराशिव : महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमातच घेतलं पेटवून, भूविकास बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल

तिने माझा विश्वासघात केला?

मृत सीतारामने आपल्या भावना व्यक्त करताना पत्रात लिहिले आहे की, त्याने पत्नीची नेहमी काळजी घेतली आणि तिला सर्व सोयीसुविधा पुरवल्या, मात्र तिच्याकडून मिळालेल्या विश्वासघातामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता. त्याने असाही आरोप केला की, तो घरी नसताना संबंधित व्यक्ती अनेकदा त्याच्या घरी येत असे. या सर्व प्रकारामुळे उद्भवलेल्या कौटुंबिक कलहातून आणि मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी त्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा : पंढरपूर : काळ्या धाग्यामुळे उघडकीस आले हत्याकांड, ऐश्वर्या मिसिंग असल्याची तक्रार आरोपीनेच दिली

खासगी व्हिडिओ व्हायरल

याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी ती 19 पानांची सुसाईड नोट ताब्यात घेतली असून तिची सत्यता पडताळली जात आहे. पत्नीचे कथित प्रेमसंबंध आणि खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या तपासातून नेमके काय सत्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.