फुटपाथवरुन 11 वर्षीय मुलीचे अपहरण, जंगलात आढळला मृतदेह, काय घडलं?

मुंबई तक

• 02:31 PM • 23 Jun 2026

एका 11 वर्षीय चिमुरडीवर जंगलात बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

फुटपाथवरुन 11 वर्षीय मुलीचे अपहरण

point

जंगलात आढळला मृतदेह

point

काय घडलं?

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 11 वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर जंगलात बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील मेहरौली भागात राहणारी ही मुलगी होती. एता नराधमाने तिचे अपहरण करुन तिला गुरुग्राममधील जंगलात नेले.  या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

पहाटे पाचला आला 'तो' फोन

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना एका नियंत्रण कक्षात (PCR) कॉल आला, ज्यामध्ये एका चिमुरडीचे फुटपाथवरून अपहरण झाल्याची माहिती देण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि पीडित मुलीचा शोध घेण्यासाठी तसेच आरोपीला पकडण्यासाठी विविध पथके तयार करून तपास सुरू केला.

हे ही वाचा : 'तीनच आमदार गायब आहेत का?', ठाकरेंच्या बैठकीवरुन शिंदे खळखळून हसले, मोठी हिंट दिली

शेकडो सीसीटीव्ही तपासले

या गुन्ह्याचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील शेकडो सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या तांत्रिक तपासाच्या आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा माग काढण्यात यश मिळवले. यानंतर तातडीने तपासाची चक्रं फिरवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा : 17 वर्षीय भाच्याकडून महिला गरोगर राहिली अन् म्हणाली...

पोलिसी खाक्या दाखवताच...

सुरुवातीला आरोपी काही बोलायला तयार नव्हता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने फुटपाथवरून मुलीचे अपहरण केल्याची आणि तिला गुरुग्रामच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या घटनेबाबत पोलीस सध्या पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आवश्यक कलमांनुसार आरोपीवर कारवाई केली जात आहे.