पीजी मालकाने पाय धुण्यापासून रोखले, संतापलेल्या दोन विद्यार्थ्यांनी बॅट घेतली अन्...

पीजीमध्ये राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी पीजी मालकाचीच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बेंगलोरमधील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:37 PM • 23 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पीजी मालकाने पाय धुण्यापासून रोखले

point

संतापलेल्या दोन विद्यार्थ्यांनी बॅट घेतली अन्...

Crime News : एका पीजीमध्ये हत्येची भयानक घटना उघडकीस आली आहे. नळाच्या पाण्याने पाय धुण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा भीषण शेवट झाला. 37 वर्षीय पीजी मालक माधव मातले यांची दोन विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण करून हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. कर्नाटकची राजधानी बेंगलोरमधील ही घटना आहे.  राकेश (21) आणि डॉन ब्राईट सन (20) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी विद्यार्थ्यांचं नाव आहे.

हे वाचलं का?

'या'वरुन झाला वाद

या प्रकरणातील आरोपी राकेश हा बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे, तर दुसरा आरोपी विद्यार्थी डॉन ब्राईट सन हा बीबीएच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. मृत माधव मातले हे 'लक्ष्मी नरसिंह पीजी'चे मालक होते. घटनेच्या वेळी त्यांनी पीजीच्या आवारात असलेल्या नळाच्या पाण्याने पाय धुणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना हटकले होते. यावरून त्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली, परंतु काही वेळातच या वादाला अत्यंत हिंसक वळण मिळाले. 

हे ही वाचा : 'संजय पाटील भो$, ती बंदूक तुझ्याच ढुं%$#@ घातली जाईल..', चिडलेल्या राऊतांची जीभ पुन्हा घसरली

बॅटने केला हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव मातले यांनी विद्यार्थ्यांना इमारतीत प्रवेश करण्यास आणि तिथे पाय धुण्यास विरोध केल्यावर, आरोपींनी त्यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे वाद अधिकच चिघळला. या शिवीगाळीमुळे संतप्त झालेल्या माधव मातले यांनी त्या विद्यार्थ्यांना मारण्यासाठी क्रिकेटची बॅट घेतली. मात्र त्या दोघांनी त्यांच्याकडील बॅट हिसकावून घेतली अन् त्यांच्यावरच हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात मातले यांना गंभीर दुखापत झाली आणि शेवटी जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : 'नार्वेकरांनी आशाताईंच्या नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला, त्यापेक्षा हिब्रूमध्ये... राज ठाकरेंच्या संतापाचा कडेलोट

मद्यप्राशन केल्याचा संशय

 या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही विद्यार्थ्यांनी घटनेपूर्वी पीजीजवळ मद्य प्राशन केली होती आणि त्यानंतर ते तिथे पाय धुण्यासाठी आले होते, ज्यातून हा संपूर्ण प्रकार घडला.