17 वर्षीय भाच्याकडून महिला गरोदर राहिली अन् म्हणाली...

Crime News : शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने महिलेच्या सांगण्यावरून तब्बल अडीच वर्षे शरीरसंबंध ठेवले. अल्पवयीन मुलाचं वय वर्षे हे 17 वर्षे असल्याची माहिती समोर आली. तर ज्या महिलेवर अत्याचार करण्यात आला त्या महिलेचं वय वर्षे हे 40 आहे. पीडितेनं भर पंचायतीत ती अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं.

Crime News

Crime News

मुंबई तक

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 03:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं मुलाला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले

point

पोटातील वाढत असलेलं बाळ अल्पवयीन मुलाचं

Crime News : शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन भाच्याने महिलेच्या सांगण्यावरून तब्बल अडीच वर्षे शरीरसंबंध ठेवले. अल्पवयीन मुलाचं वय वर्षे हे 17 वर्षे असल्याची माहिती समोर आली. तर जी महिला गरोदर राहिली त्या महिलेचं वय वर्षे हे 40 आहे. महिलेनं भर पंचायतीत ती अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं. पोटात वाढणारं मुल अल्पवयीन मुलाचंच आहे, असं तिनं सांगितलं. अशातच अल्पवयीन मुलाच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी महिलेला अटक केली होती. या प्रकरणा उत्तर प्रदेशातील अलीगढमधून उघडकीस आला होता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : निर्जला एकादशीला नव पंचम राजयोगाची निर्मिती, 'या' राशींचे उजळेल भाग्य

महिलेनं मुलाला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले

पीडित अल्पवयीन मुलाने कुटुंबीयांना सांगितलं की, संबंधित महिला ही त्याला सातत्याने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती. अनेकदा तिने पीडित मुलाला शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती. जर कोणाला काही सांगितल्यास रेपचा गुन्हा दाखल करेन, अशी अनेकदा धमकी दिली. पीडित मुलाने घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. 

ग्रामस्थांनी बोलावलेल्या पंचायतीत काय घडलं? 

प्रकरण लक्षात घेता, ग्रामस्थांनी एक पंचायत घेतली आणि पोलीस इंस्पेक्टर डीके सिसौदिया यांना देखील येण्यास सांगितलं. पंचायतीत पतीनं आणि सासरच्या मंडळींनी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न देखील केला. तेव्हा तिचा नवरा तिला आपल्यासोबत ठेवण्यास तयार झाला, मात्र दोन मुलांची आई कोणाचंच ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. तिनं नवऱ्यासोबत राहणार नाही असं सांगितलं, तिला त्या अल्पवयीन मुलासोबतच राहायचं होतं. 

पोटातील वाढत असलेलं बाळ अल्पवयीन मुलाचं

अशातच पोलिसांच्या माहितीनुसार, पंचायत सुरू असताना महिलेने सर्वांसमोर तिनं सांगितलं की, तिच्या पोटातील वाढत असलेलं बाळ हे त्या अल्पवयीन मुलाचं आहे. पोलिसांनी किशोरच्या आईच्या तक्रारीवरून एफआरआय नोंदवली, या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. 

हे ही वाचा : पुणे : किल्ल्यावरुन सेल्फी काढताना पडला नाही, होणाऱ्या बायकोने गेम केल्याचा संशय अन्...

पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलाला मेडिकल तपासणीसाठी रुग्णालयात नेले. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत आरोपी महिलेविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.