Kalyan Crime News : कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी अख्तर मनियार आणि सलीम शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोघे 60 वर्षांचे आहेत. अल्पवयीन मुलीला आपल्या घरात बोलून तिच्यावर दोघांनी अत्याचार केला आहे. अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्यांनी लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलीची सुटका करत या दोघांना ताब्यात घेतले. कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
ADVERTISEMENT
60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले
अधिकची माहिती अशी की, कोळसेवाडी येथील एका घरातून एका 15 वर्षांच्या मुलीचा आरडाओरडा ऐकू येत होता. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाग आली. लोकांनी घरात जाऊन पाहिलं तर घरभर रक्त पसरलेलं होतं. लोकांनी याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि मुलीची सुटका करत अख्तर मणियार (64) आणि सलीम शेख (60)या दोघा नराधमांना बेड्या ठोकल्या. हे दोघे रात्रीच्या वेळी एक पंधरा वर्षांच्या मुलीला घरात घेऊन आले होते. घरातच तिच्यावर दोन नराधमाने लैंगिक अत्याचार केले. ही मुलगी गरीब कुटुंबातील असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा : 'Operation Tiger देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनात झालं', भाजप आमदाराचा गौप्यस्फोट
ओरडण्याचा आवाज आला अन् संपूर्ण घरात रक्त..
माहितीनुसार, आरोपी मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीच्या व्यवसाय करतो . तर सलीम हा रिक्षा चालक आहे. हे नेहमी विविध मुलींना रात्रीच्या वेळेला या घरात घेऊन येतो. नेहमीप्रमाणे काल देखील त्यांनी अशाच प्रकारचा कृत्य केलं. या वेळेला अचानक या घरातून ओरडण्याचा आवाज आला आणि त्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी पोलिसांना फोन करून ही घटना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता पूर्ण घरामध्ये रक्त पडलेलं दिसलं यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. सध्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून पुढचा तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT











