Crime News : आपल्या मालकाची मालमत्ता बळकावण्यासाठी एका नोकराने भयानक पाऊल उचलले. त्याने आपल्या मालकासह त्याची पत्नी आणि चार मुलांची अशी एकूण सहा जणांची हत्या केली. याप्रकरणी त्याला सुरुवातीला अटक झाली होती. मात्र काही काळासाठी तो अंतरिम जामीन मिळाल्यावर बाहरे आला आणि फरार झाला. त्याला आता अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. साहिब खान उर्फ बंटी (36) असे या आरोपी नोकराचे नाव आहे. या नराधमाने 2017 मध्ये वेगवेगळ्या वेळी या सहा हत्या केल्याचा आरोप आहे. दिल्लीतील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
मालक बलात्काराच्या प्रकरणात जेलमध्ये
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिब खान 2014 मध्ये प्रॉपर्टी डीलर मुनव्वर खान याच्याकडे कामाला लागला होता आणि हळूहळू त्याने मुनव्वरचा विश्वास संपादन केला. 2016 मध्ये मुनव्वर एका बलात्काराच्या प्रकरणात जेलमध्ये गेल्यानंतर साहिबने त्याच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा काटा काढण्याची अत्यंत क्रूर आणि सुनियोजित कट रचला. त्याने पहिल्यांदा मुनव्वरची पत्नी आणि दोन मुलींना बलात्काराचा खटला मिटवण्याच्या बहाण्याने उत्तर प्रदेशातील मवाना येथे बोलावून घेतले, तिथे त्यांची गोळ्या झाडून हत्या केली आणि मृतदेह कालव्यात फेकून दिले. यानंतर त्याने मुनव्वरच्या दोन मुलांची दिल्लीत गळा आवळून हत्या केली आणि त्यांचे मृतदेह आधीच खोदून ठेवलेल्या खड्ड्यात गाडले. नंतर, जेव्हा मुनव्वर आपल्या बेपत्ता कुटुंबाचा शोध घेण्यासाठी अंतरीम जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, तेव्हा आरोपीने त्याचीही गोळ्या झाडून हत्या केली.
हे ही वाचा : बायकोनं सोडल्यावर संन्यास घेतला, आता आश्रमाच्या मागे सापडली बॉडी, साधूला कुणी संपवलं?
बहिणीच्या लग्नासाठी बाहेर, पण...
हे संपूर्ण प्रकरण 2017 मध्ये पहिल्यांदा समोर आले होते, जेव्हा मुनव्वरची पत्नी आणि चार मुले बेपत्ता झाल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा करण्याच्या छुप्या कटाचा पर्दाफाश केला आणि साहिबला अटक केली. त्यावेळी चौकशी दरम्यान साहिबने सर्व सहा हत्यांची कबुली दिली होती, ज्यानंतर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे नोंदवून त्याला आणि त्याच्या साथीदारांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षी 14 ऑक्टोबर 2025 रोजी त्याला बहिणीच्या लग्नासाठी 15 दिवसांचा अंतरीम जामीन मंजूर झाला होता. जामिनाची मुदत संपल्यानंतर तो शरण आला नाही आणि फरार झाला. त्यामुळे या वर्षी 5 मे रोजी दिल्लीच्या एका न्यायालयाने त्याला घोषित गुन्हेगार ठरवले होते.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' ठिकाणी ऊन तर लवकर पाऊस लावणार हजेरी
फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी
वेगवान न्यायालयामध्ये (फास्ट ट्रॅक कोर्ट) या हत्याकांडाची सुनावणी सुरू होती, मात्र आरोपी फरार झाल्यामुळे न्यायालयीन कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला होता. अखेर गुप्त माहिती आणि तांत्रिक देखरेखीच्या (टेक्निकल सर्व्हेलन्स) आधारे दिल्ली पोलिसांनी 14 जून रोजी साहिब खानला पुन्हा बेड्या ठोकल्या. ताज्या चौकशीत आरोपीने सांगितले की, तो पोलिसांपासून वाचण्यासाठी सतत आपली ठिकाणे बदलत होता आणि हरियाणातील सोनीपत येथे भाड्याच्या घरात राहत होता. तसेच मुनव्वर खानच्या मालमत्तांवर लक्ष ठेवण्यासाठी तो अधूनमधून लपून-छपून येत होता. या अटकेमुळे आता न्यायालयातील प्रलंबित खटल्याला गती मिळणार आहे.
ADVERTISEMENT











