12 वर्षाच्या लेकासमोर आईवरच लैंगिक अत्याचार, नंतर..

Crime News : आईवर 12 वर्षाच्या लेकासमोर लैंगिक अत्याचार करण्यात आला. धक्कादायक बाब अशी की, गुन्हेगार चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसले, परंतु नंतर त्यांनी माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.

crime news

crime news

मुंबई तक

• 07:05 PM • 20 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

12 वर्षाच्या मुलासमोर आईवर लैंगिक अत्याचार 

point

वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण

Crime News : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आईवर 12 वर्षाच्या लेकासमोर लैंगिक अत्याचार करण्यात आला. धक्कादायक बाब अशी की, गुन्हेगार चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसले, परंतु नंतर त्यांनी माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना उज्जैन शहरापासून 65 किमी अंतरापासून बडनगर तहसील परिसरातील एका गावात घडली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : भोंदू बाबाकडून महिलेवर बलात्कार अन्....

12 वर्षाच्या मुलासमोर आईवर लैंगिक अत्याचार 

18 जून रोजी मध्यरात्री पाच जण पवनचक्कीची तार चोरण्याच्या उद्देशाने पीडित महिलेच्या घरात शिरले. तेव्हा पती पत्नी आणि त्यांचा 12 वर्षीय मुलगा गाढ झोपी गेला होता. झोपलेलं पाहूनच संबंधितांनी डाव साधत माणुकीला लाज आणणारे कृत्य केले. 

गु्न्हेगारांनी कुटुंबाला जागे केले आणि महिलेच्या पतीला जबरदस्ती बाहेर नेले, नंतर मारहाण केली आणि पवनचक्कीचा तारा देखील चोरल्या, याच घटनेदरम्यान पीडितेला मुलगा एका शेडमध्ये होता. 

दरम्यान पीडितेनं केलेल्या जबाबानुसार, काही गुंड झोपडीत घुसले होते. नंतर महिलेला आणि तिच्या मुलाला जवळच्या झुडुपात नेत धमकावले, नंतर त्या चिमुरड्यासमोर महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनं मुलगा भयभीत झाला होता. पीडित महिला आणि मुलाने पोलिसांना सांगितलं की, हल्लेखोरांकडे शस्त्रे होती. 

हे ही वाचा : परभणी: मंदिराच्या गाभाऱ्यात काळाचा घाला, एका क्षणात कसा गेला 6 जणांचा जीव?

वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण

वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली आणि नंतर धमकावले. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला. मात्र, पीडिता आणि तिच्या मुलाचा दावा असा की, तीन गुन्हेगारांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता. असातच पोलिसांनी गुन्हा दाखलव करून आरोपींचा शोध सुरू केला.