Crime News : बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 11 जून रोजी रात्रीच्या सुमारास पाच नराधमांनी एका घरात घुसून एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेवर क्रूरपणे हल्ला करत तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. या घटनेदरम्यान आरोपींनी पीडितेच्या पतीला एका खोलीत कोंडून ठेवले होते. या अमानुष कृत्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
अमानुष अत्याचाराने बिहार हादरले
ही घटना चाकिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, 11 जून रोजी रात्री 11:30 च्या सुमारास ती स्वच्छतागृहात गेली असता, पाच जणांनी बळजबरीने तिच्या घरात प्रवेश केला. त्यांनी आधी तिच्या पतीला खोलीत कोंडले आणि ती परत आल्यावर तिचे तोंड दाबून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर आरोपींनी धारदार शस्त्राने तिच्या शरीरावर विविध ठिकाणी गंभीर जखमा केल्या आणि तिला गंभीर अवस्थेत सोडून पळ काढला.
हे ही वाचा : ‘किमान आदित्य ठाकरेंनी तरी...’, फुटलेले ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
वैद्यकीय तपासणीत धक्कादायक वास्तव समोर
घटनेनंतर पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व प्राथमिक उपचारानंतर 12 जून रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, घरी परतल्यानंतरही तिच्या पोटात तीव्र वेदना होत राहिल्या. त्यामुळे 17 जून रोजी तिला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिची सखोल वैद्यकीय तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पीडितेच्या गुप्तांगातून एक जिवंत काडतूस (बुलेट), एक दगड आणि लाकडाचा तुकडा बाहेर काढला, ज्यावरून आरोपींच्या क्रूरतेची भीषणता स्पष्ट होते.
हे ही वाचा : प्रसिद्ध डॉक्टरने 45 वर्षीय मोलकरणीला संपवले, कारण वाचून हादरुन जाल
विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना
या संतापजनक घटनेची दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक वैद्यकीय मंडळ (Medical Board) स्थापन करण्यात आले आहे. तसेच घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली असून, फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे.
ADVERTISEMENT











